"रात्रीचे ८ वाजले की ते..." हिमानी शिवपुरींनी उलगडलं 'संस्कारी बाबूजीं'चं खरं रुप; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 10:24 AM2024-09-09T10:24:59+5:302024-09-09T10:25:45+5:30

'हम साथ साथ है' सिनेमावेळी अलोक नाथ यांनी नशेत केला धिंगाणा?

Himani Shivpuri reveals real image of sanskari babuji Alok Nath | "रात्रीचे ८ वाजले की ते..." हिमानी शिवपुरींनी उलगडलं 'संस्कारी बाबूजीं'चं खरं रुप; म्हणाल्या...

"रात्रीचे ८ वाजले की ते..." हिमानी शिवपुरींनी उलगडलं 'संस्कारी बाबूजीं'चं खरं रुप; म्हणाल्या...

अभिनेत्री हिमानी शिवपुरी (Himani Shivpuri) हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय अनुभवी कलाकार आहेत. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये छोट्या भूमिकांमधूनही लक्ष वेधून घेतलं. 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'कभी खुशी कभी गम', 'मै प्रेम की दिवानी हूँ' यासह अनेक सिनेमांमधून त्या प्रेक्षकांसमोर आल्या. 'हम साथ साथ है' सिनेमावेळी प्रसिद्ध अभिनेते 'संस्कारी बाबूजी' आलोक नाथ (Alok Nath) यांच्याविषयी नुकतंच त्यांनी मुलाखतीत भाष्य केलं.

मी टू मोहिमेवेळी आलोक नाथ याच्यावर अनेक आरोप लागले होते. दारुच्या नशेत त्यांनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप काही अभिनेत्रींनी लावले. आलोक नाथ यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता हे नुकतंच हिमानी शिवपुरी यांनी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्या म्हणाल्या, "आलोक नाथ जेव्हा दारु प्यायचे नाहीत तेव्हा त्यांची इमेज पडद्यावर संस्कारी बाबूजींसारखी दिसायची. मात्र दारु प्यायली की त्यांचं रुपच बदलून जायचं. मी त्यांच्यासोबत आधीही बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व जॅकल अँड हाईड सारखं होतं. दारु पिण्याच्या आधी एक आणि दारुच्या नशेत एक. हम आपके है कौन च्या शूटिंगवेळी त्यांनी दारु पिऊन नुसता धुमाकूळ घातला होता. आधी सेटवर ते शांत आणि प्रोफेशलच वागायचे. मात्र घड्याळात रात्रीचे ८ वाजले की त्यांचं वेगळंच रुप दिसायचं."

त्या पुढे म्हणाल्या, "नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये झालेली एक घटना सोडली तर नंतर कधीच मला त्यांच्यासोबत काम करताना अडचण आली नाही. पण ते दारु प्यायल्यानंतर कसे वागतात हे मी अनेक लोकांकडूनही ऐकलं. मी स्वत:ही ते पाहिलं आहे. एकदा विमानात मी आलोक नाथ आणि त्यांच्या पत्नीसोबत प्रवास करत होते. तेव्हा आलोक नाथ दारुच्या नशेत नियंत्रणाबाहेर होते. त्यांची पत्नी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मी स्वत: त्यांना ताकीद दिली की नीट वागा नाहीतर विमानातून उतरवलं जाईल. त्यांच्या या सवयीमुळे आधीही त्यांना विमानातून उतरवलं गेलं होतं."

Web Title: Himani Shivpuri reveals real image of sanskari babuji Alok Nath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.