Youtube vs TikTok लढाईत' हिंदुस्तानी भाऊची धमाकेदार एन्ट्री, 15 लाख फॉलोअर्स असलेलं अकाऊंट केलं डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 12:32 PM2020-05-16T12:32:34+5:302020-05-16T12:32:34+5:30

आपल्या समस्त फॅन्सना टिक-टॉक डिलीट करण्याचे आवाहन केले आहे.

hindustani bhau deleted tiktok account In support of carryminati gda | Youtube vs TikTok लढाईत' हिंदुस्तानी भाऊची धमाकेदार एन्ट्री, 15 लाख फॉलोअर्स असलेलं अकाऊंट केलं डिलीट

Youtube vs TikTok लढाईत' हिंदुस्तानी भाऊची धमाकेदार एन्ट्री, 15 लाख फॉलोअर्स असलेलं अकाऊंट केलं डिलीट

googlenewsNext

सध्या सोशल मीडियावर युट्यूब विरूद्ध टिक टॉक असे युद्ध सुरु आहे. सुप्रसिद्ध व लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी आणि टिक टॉक स्टार आमिर सिद्दीकी यांच्यात या महायुद्धाची ठिणगी पडली होती. या महायुद्धाची सुरुवात कशी झाली तर सर्वप्रथम आमिर सिद्दीकीने एक व्हिडीओ शेअर केला. यात त्याने सर्व युट्यूबर्सची खिल्ली उडवली. आम्ही टिक टॉक स्टार युट्यूबर्सपेक्षा कसे श्रेष्ठ हे त्याने या व्हिडीओत छातीठोकपणे सांगितले. हा व्हिडीओ कॅरी मिनाटीने पाहिला आणि त्याला राहावले नाही. मग काय, कॅरीने आमिरची अशी काही खिल्ली उडवली की, त्याचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. त्यानंतर युट्यूबने कॅरीचा हा व्हिडीओ डिलीट केला आणि नेटक-यांनी ट्विटरवर नुसता गोंधळ घातला होता.  आता या महायुद्धात हिंदुस्तानी भाऊने ही उडी घेतली आहे.

हिंदुस्तानी भाऊने आपले टिक टॉक अकाऊंट डिलीट मारले आहे.  हिंदुस्तानी भाऊचे टिक टॉकवर तब्बल 15 लाख फॉलोवर्स होते असे असतानाही हिंदु्स्तानीने भाऊ युट्यूबच्या बाजूने या युद्धात उतरला आहे. हिंदुस्तानी भाऊने टिक-टॉकचं अकाऊंट डिलीट करतानाचा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडीओ भाऊने टिक-टॉकला खडे बोल सुनावले आहेत.

त्याने आपल्या समस्त फॅन्सना टिक-टॉक डिलीट करण्याचे आवाहन या व्हिडीओमध्ये केले आहे. तसेच सगळ्या युट्यूर्बसच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची विनंती करत कॅरी मिनाटीला सपोर्ट  केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ 12 लाख 40 हजारापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. बिग बॉस 13 मध्ये हजेरी लावत हिंदुस्तानी भाऊ लाईमलाईटमध्ये आला होता. 

Web Title: hindustani bhau deleted tiktok account In support of carryminati gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.