रुपेरी पडद्यावर रंगणार हॉकी, 'ही' अभिनेत्री दिसणार हटके भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 02:25 PM2018-07-30T14:25:14+5:302018-07-30T14:27:42+5:30

रुपेरी पडद्यावर आजवर विविध खेळांचं दर्शन रसिकांना झालं आहे. क्रिकेट, हॉकी , रनिंग, बॉक्सिंग, कुस्ती अशा खेळांवर आधारित सिनेमा ...

Hockey will be played on a silver screen; | रुपेरी पडद्यावर रंगणार हॉकी, 'ही' अभिनेत्री दिसणार हटके भूमिकेत

रुपेरी पडद्यावर रंगणार हॉकी, 'ही' अभिनेत्री दिसणार हटके भूमिकेत

googlenewsNext

रुपेरी पडद्यावर आजवर विविध खेळांचं दर्शन रसिकांना झालं आहे. क्रिकेट, हॉकी, रनिंग, बॉक्सिंग, कुस्ती अशा खेळांवर आधारित सिनेमा रसिकांनी डोक्यावर घेतले. खेळ प्रेमी अशी ओळख असलेल्या आपल्या देशात इकबाल, एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी असे क्रिकेटवर आधारित सिनेमा जितके हिट ठरले तितकीच पसंती 'दंगल', 'चक दे' 'इंडिया', 'मेरी कॉम', 'सुलतान' या विविध खेळांवर आधारित सिनेमांनाही मिळाली. आता आणखी एका खेळाचं दर्शन रसिकांना रुपेरी पडद्यावर घडणार आहे. 'हॉकी' हा खेळ आता रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. मुल्क सिनेमात हॉकीचा खेळ रंगलेला पाहायला मिळेल.या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.या सिनेमात ती हॉकीपटूची भूमिका साकारणार आहे.सूरमा सिनेमानंतर तापसी आता मुल्कच्या शूटिंगमध्ये बिझी झाली आहे. सूरमा सिनेमातील तापसीच्या भूमिकेला चांगली पंसीत मिळाली होती.

 

 

आता हॉकीवर आधारित या सिनेमात तापसी हटके आणि वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमातील आपल्या या भूमिकेसाठी तापसी  बरीच मेहनत घेत आहे. नेशनल हॉकी प्लेयरच्या भूमिके तापसी झळकणार म्हटल्यावर खेळाडूप्रमाणे फिट दिसण्यासाठी तिने आपल्या फिटनेसवर बरेच कष्ट घेतले आहेत. त्यामुळे सिनेमातील तापसी ही भूमिका थोडी खास असणार आहे. संदीप सिंहकडून तिने या खेळाचे सगळे बारकावे शिकले आहेत.

तापसी पन्नू व ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'मुल्क' चित्रपटाबाबतची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतीक बब्बर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो या सिनेमात वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांचा उपयोग या चित्रपटातील भूमिकेसाठी केल्याचे प्रतीकने सांगितले. 

ऋषी कपूर, आशुतोष राणा, नीना गुप्ता यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. मात्र त्यांच्याबरोबर काम करताना सुरूवातील थोडे दडपण होते. या कलाकारांचे काम इतके उत्तम आहे. त्यामुळे नेहमीच आपले काम चांगले करण्याच्या प्रयत्नात होतो. तसेच आपले काम कसे झाले आहे याबद्दल सतत अनुभव सिन्हा यांना विचारायचो. त्यांनी केलेल्या सूचना ध्यानी ठेवून काम केले, असे प्रतीक सांगत होता. 
 

Web Title: Hockey will be played on a silver screen;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.