Chhaava Movie: होळीला 'छावा' चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, कमावले इतके कोटी

By सुजित शिर्के | Updated: March 15, 2025 09:03 IST2025-03-15T09:01:15+5:302025-03-15T09:03:01+5:30

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे.

holi 2025 chhaava movie box office collection starring vicky kaushal rashmika mandanna and akshaye khanna | Chhaava Movie: होळीला 'छावा' चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, कमावले इतके कोटी

Chhaava Movie: होळीला 'छावा' चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, कमावले इतके कोटी

Chhaava Box Collection: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. १४ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक समीक्षक, कलाकार या चित्रपटाची स्तुती करताना दिसत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात विकी कौशल (vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची मुख्य भूमिका आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला असून बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घौडदौड सुरुच आहे.

'छावा' चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. होळी आणि रंगपंचमीला चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'छावा' ने होळीच्या दिवशी भारतात ७.२५ कोटींची कमाई केली आहे.  मॅडॉक फिल्म्सची निर्मिती असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटाने भारतात 
५५९. ४३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दरम्यान, ही आकडेवारी ही प्रारंभिक आहे, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने 'स्त्री -२', 'दंगल', 'पठाण', 'गदर-२' आणि 'जवान' चित्रपटांचे रेकॉर्डस देखील मोडले आहेत.

दरम्यान, 'छावा' चित्रपटातविकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटामध्ये आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत सिंह, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचबरोबर अभिनेता संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे मराठी कलाकार सुद्धा झळकले आहेत.

Web Title: holi 2025 chhaava movie box office collection starring vicky kaushal rashmika mandanna and akshaye khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.