Holi Songs: ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:56 AM2019-03-21T05:56:45+5:302019-03-21T05:57:59+5:30

होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूड, मराठी चित्रपटातील गाणी नसतील, असे शक्यच नाही.

holi celebration bollywood songs | Holi Songs: ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच

Holi Songs: ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक वर्षं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनेक होळीची गाणी आहेत.

होळीचा सण म्हणजे आनंद, आरोग्य आणि संस्मरणीय क्षणांना रंगांनी न्हाऊ घालणे! होळी सेलिब्रेट करण्यासाठी वयाचे बंधन कधीच नसते. प्रत्येकजण या सणाचा आनंद लुटत असतो. होळी आणि चित्रपटातील गाणी यांचे एक वेगळे कनेक्शन आहे. होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूड, मराठी चित्रपटातील गाणी नसतील, असे शक्यच नाही. गेली अनेक वर्षं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनेक होळीची गाणी आहेत. अशीच काही होळीची खास गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होळी सेलिब्रेट करताना या गाण्यावर तुम्ही देखील नक्कीच ताल धरा...


बलम पिचकारी

बलम पिचकारी हे गाणे ये जवानी है दिवानी या चित्रपटातील असून हे गाणे शाल्मली खोब्रागडेने गायले आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीरवर चित्रीत झालेले हे गाणे तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे.


होली खेले 
बागबान या चित्रपटातील होली खेले रघुवीरा हे गाणे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. या गाण्यात हेमा मालिनी आणि अमिताभ यांची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते.

रंग बरसे
अमिताभ बच्चन यांनी गायलेले रंग बसरे हे गाणे रसिकांचे प्रचंड आवडते गाणे आहे. अमिताभ बच्चन यांच्या सिलसिला या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरीही ते गाणे तितकेच ताजे आहे. 

होली के दिन... 
शोले या चित्रपटातील होली के दिन... हे गाणे म्हणजे, रंगांमध्ये न्हाऊन निघालेल्या प्रेमींच्या मनातील नेमक्या भावना. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गाण्यात धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी त्यांच्या नृत्याने चार चाँद लावले होते.

अरे जा रे हट नटखट...
ग्रेट क्लासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गाण्याशिवाय होळी सेलिब्रेशन करणे हे अशक्यच आहे. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित नवरंग या सिनेमातील महिपाल आणि संध्या यांनी जिवंत केलेले हे गाणे म्हणजे एक अल्टीमेट होली साँग.

 

अंग से अंग लगाना
डर या चित्रपटातील अंग से अंग लगाना या गाण्यावर जुही चावला, अनुपम खेर यांनी तुफान डान्स केला आहे. हे गाणे होळीच्या पार्टीला आवर्जून लावले जाते. 

आज ना छोडेंगे
कट्टी पतंग या चित्रपटातील आज ना छोडेंगे हे गाणे राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्यावर चित्रीत केले आहे. या गाण्यात राजेश खन्ना यांचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणं १९७० साली प्रदर्शित झालं असलं तरी नवीन चालींच्या गाण्यांना तितकंच आव्हान देणारे आहे.

डू मी अ फेवर लेट्स प्ले होली  
अनु मलिक आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं हे गाणं अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित झालं होतं. तसंच थोडं हॅालिवूडचा अंदाज दिलेलं हे गाणं प्रत्येक होळीच्या गाण्यांच्या लिस्टमध्ये असतंच. २००५ नंतर प्रत्येक वर्षी होळीच्या गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश असतोच.

सोनी सोनी अखियोंवाली
शाहरूख खानच्या 'मोहब्बते' चित्रपटातील सोनी सोनी अखियोंवाली या गाण्यातून होळीच्या निमित्ताने आपण प्रेमही व्यक्त करू शकतो असं दाखवलं गेलं. तसंच तरूणांनी होळीची मजा घेत आपल्या आयुष्यालाही नवनवे रंग देण्याची गरज असते असा सल्लाही या गाण्यातून देण्यात आला आहे.

होळीचा रंग लय भारी
होळीचा रंग लय भारी हे गाणे लय भारी या चित्रपटातील असून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले आहे. या गाण्यातील त्या दोघांची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडते. 

राधे नाच नाच उडवूया रंग
राधे नाच नाच उडवूया रंग हे गाणे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी अशोक सराफ आणि रंजना यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याला आज इतकी वर्षं झाली असली तरी हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे.

Web Title: holi celebration bollywood songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.