हनी सिंगचे गर्लफ्रेंड टीना थडानीसोबत झाले ब्रेकअप; डिलीट केलं सगळे फोटो, वर्षभरातच का तुटलं नातं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:57 PM2023-04-19T12:57:47+5:302023-04-19T13:33:23+5:30
हनी सिंग आणि टीना थडानी एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वेगळे झाले आहेत.
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग(Honey Singh)ने नुकतीच आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. बराच काळ बॉलिवूड जगतापासून दूर राहिल्यानंतर तो पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. हनी सिंगच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत आहे. हनी सिंगचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये अभिनेत्री-मॉडेल टीना थडानीसोबत दिसत होती. यानंतर या दोघांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. पण आता या दोघांबद्दल एक नवीन बातमी येत आहे, ज्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हनी सिंग आणि टीना थडानीचं झाले ब्रेकअप!
गायक-रॅपर यो यो हनी सिंग आणि टीना थडानी पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. यापूर्वी त्यांच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, हनी सिंग आणि टीना थडानी यांच्यात सर्व काही ठीक नाही. हनी सिंग आणि टीना थडानी दोघेही सध्या वेगळे झाले आहेत. दोघांनी एकमेकांसोबतचे सर्व फोटो डिलीट केल्याचे सांगितले जात आहे
एक वर्षपण नाही चालले अफेअर
सप्टेंबर २०२२ मध्ये पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतल्यानंतर हनी सिंग सिंगल झाला. यानंतर गायिका टीना थडानीचे नाव जोडले जाऊ लागले. दोघांनी एकत्र एका इव्हेंटमध्ये एंट्री केली होती. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीना थडानी आणि हनी सिंगचे अफेअर 2022 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू झाले होते. आता रिपोर्ट्सनुसार, हनी सिंग आणि टीना थडानी एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वेगळे झाले आहेत.