तब्बल १८ महिने घरात बंद होता हनी सिंग, दारू आणि डिप्रेशनमुळे झाली होती अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 02:20 PM2019-03-15T14:20:18+5:302019-03-15T14:20:39+5:30
बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर हनी सिंग १५ मार्चला बर्थडे साजरा करतो आहे. मागील वर्षी हनी सिंग डिप्रेशननंतर त्याने 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातून कमबॅक केले होते.
बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर हनी सिंग १५ मार्चला बर्थडे साजरा करतो आहे. मागील वर्षी हनी सिंग डिप्रेशननंतर त्याने 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातून कमबॅक केले होते. त्याशिवाय हनी सिंगने एक म्युझिक अल्बमदेखील लाँच केले. हनी सिंगने करियरच्या सुरूवातीली रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून सुरूवात केली होती. 'कॉकटेल' (२०१२)मधील 'मैं शराबी' गाण्यातून त्याला ओळख मिळाली. हनी सिंगने मुलाखतीत सांगितले की, 'बायपोलर डिसआर्डरच्या जवळपास १८ महिने पीडित होतो.'
टाइम्स ऑफ इंडियाला हनी सिंगने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'ते १८ महिने माझ्या जीवनातील सर्वात वाईट काळ होता. या काळात मी माझ्या नोएडातील घरात होतो. मी बायपोलर डिसऑर्डरने पीडित होतो. या आजारावर १८ महिने उपचार सुरू होते.'
हनी म्हणाला की, 'मी बायपोलरच्या आजारासोबत दारूही पित होतो. ज्यामुळे माझी अवस्था आणखीन बिघडली. '
एक वेळ असा होता की मी यातून कधीच बाहेर पडणार नाही, असे हनीला वाटत होते. त्याच्यावर औषधांचादेखील फरक पडत नव्हता. त्याने पुढे सांगितले की, 'एका रात्री जेव्हा मी झोपेच्या गोळ्या खाल्यानंतरही झोपलो नाही. त्यावेळी मी राइज अँड शाइन नावाचे गाणे लिहिले आणि कंपोझ केले. हे सर्व पाहून माझी आई रडली होती. या कारणामुळेच मी आज त्या आजारातून बाहेर पडू शकलो.'
खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर हनी सिंगने २०११ साली शालिनीसोबत लग्न केले होते. हनी सिंग व शालिनी एकाच वर्गात होते आणि शिकता शिकता त्या दोघांमध्ये प्रेम जुळले. ही गोष्ट त्यांनी मीडियापासून लपवून ठेवले.