Honey Singh: 'माझ्या डोक्यात...', हनी सिंगचा बायपोलर डिसऑर्डर आजारावर हैराण करणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:12 PM2022-12-23T13:12:43+5:302022-12-23T13:16:41+5:30

प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंह त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे सध्या खूप चर्चेत आहे.

Honey Singh shocking revelation on bipolar disorder mental problem and failure | Honey Singh: 'माझ्या डोक्यात...', हनी सिंगचा बायपोलर डिसऑर्डर आजारावर हैराण करणारा खुलासा

Honey Singh: 'माझ्या डोक्यात...', हनी सिंगचा बायपोलर डिसऑर्डर आजारावर हैराण करणारा खुलासा

googlenewsNext

प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंह त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे सध्या खूप चर्चेत आहे.  'ब्राउन रंग', 'देसी कलाकर' आणि 'ब्लू आईज' सारखी डझनभर ब्लॉकबस्टर गाणी देऊन हनी सिंहनं दिली आहे. पण एक काळ असा होता की हनी सिंहला बायपोलर डिसऑर्डरचे निदान झाले आणि त्यामुळे अनेक वर्षे तो नैराश्यात होता. या आजारामुळे हनी सिंग केवळ संगीत जगतापासून दूर गेला होता. औषधांमुळे त्याचे वजनही खूप वाढले होते. पण हनी सिंगने हिम्मत हारली नाही आणि सर्व अडचणी पार करून पुन्हा एकदा स्वत:ला उभे केले.

हनी सिंह आता परतला आहे आणि त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. हनी सिंहने नुकतेच एका मुलाखतीत त्याच्या आजार आणि मानसिक आरोग्याविषयी सांगितले. हनी सिंहने स्वतःला बायपोलर डिसऑर्डर असल्याचे निदान केव्हा आणि कसे कळले आणि लोकांचे त्यानंतर त्याच्याशी वागणं कसं बदलले याबद्दल देखील सांगितले. हनी सिंहला 2014 मध्ये बायपोलर डिसऑर्डरचे निदान झाले होते. त्यानंतर हनी सिंगची गाणी येणं बंद झाले. त्यानंतर हनी सिंहने सांगितले की, त्याला गंभीर मानसिक आजार आहे. त्यावेळी त्यानं मद्यपान सुरू केले होते, त्यामुळे प्रकृती अधिकच बिघडली होती.


हनी सिंहने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'जेव्हा मी आजारी पडलो, तेव्हा आयुष्यात खूप काही घडत होते. मी शाहरुख खानसोबत SLAM टूर देखील केली होती. मी स्टार प्लसच्या एका प्रोजेक्टवरही काम करत होतो. हा प्रोजेक्ट डिझाइन करण्यासाठी मी एक वर्ष काम केले. शो सुरू झाला तेव्हा माझ्याकडे खूप काम होते. मी पंजाबी चित्रपटही करत होतो. अशा अनेक गोष्टी आयुष्यात घडत होत्या. जेव्हा मी 'रॉ स्टार'च्या सेटवर बेशुद्ध पडलो आणि मला बायपोलर डिसऑर्डरबद्दल कळले तेव्हा मी म्हणालो की माझ्या डोक्यात काही तरी प्रोब्लेम आहे. काहीतरी झालंय. मला ते ठीक कराचंय.

हनी सिंहने नुकतेच 'रंगीला' चित्रपटातील 'यायी रे' हे गाणे रिमिक्स केले आहे, जे खूप पसंत केले जात आहे. हनी सिंहने 2003 मध्ये सेशन आणि रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो संगीतकार बनला आणि नंतर स्वत:ची गाणी स्वत: तयार करून संगीतविश्वात ओळख निर्माण केली.

Web Title: Honey Singh shocking revelation on bipolar disorder mental problem and failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.