दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर; म्हैसूर विद्यापीठाकडून अभिनेत्याला मानद डॉक्टरेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:11 PM2022-03-14T12:11:33+5:302022-03-14T12:12:12+5:30

Puneeth rajkumar: वयाच्या ४६ व्या वर्षीय या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याचं निधन झालं. पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वाला जबर धक्का बसला.

honorary doctorate for late actor puneeth rajkumar from university of mysore | दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर; म्हैसूर विद्यापीठाकडून अभिनेत्याला मानद डॉक्टरेट

दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर; म्हैसूर विद्यापीठाकडून अभिनेत्याला मानद डॉक्टरेट

googlenewsNext

एकेकाळी दाक्षिणात्य कलाविश्वात अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचा एक दबदबा होता. मात्र, वयाच्या ४६ व्या वर्षीय या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याचं निधन झालं. पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वाला जबर धक्का बसला होता. मात्र, ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. यामध्येच आता पुनीत यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवंगत अभिनेता पुनीत यांनी म्हैसूर विद्यापीठाने मानद डॉक्टरेट (मरणोत्तर) प्रदान करण्याचं जाहीर केलं आहे.

म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हेमंत कुमार यांनी रविवारी याविषयीची घोषणा केली. पुनीत राजकुमार यांनी  कलाविश्वात दिलेल्या योगदानासाठी आणि परोपकारी कार्यासाठी त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

२२ मार्च रोजी होणाऱ्या १०२ व्या दीक्षांत समारंभात पुनीत यांच्या वतीने त्यांच्या पत्नी त्यांच्या डॉक्टरेट पदवीचा स्वीकार करणार आहेत. पुनीत यांनी म्हैसूर येथील शक्तीधाम आश्रमात त्यांच्या आईसोबत अनेकवर्ष सेवा केली होती. इतकंच नाही तर पुनीत जवळपास २६ अनाथाश्रम, १५ मोफत शाळा, १६ वृद्धाश्रम, १९ गोठ्यांमध्ये दानधर्म आणि मदतकार्य करत होते.  दरम्यान, २९ ऑक्टोबर २०२१ मध्ये पुनीत यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यावेळी ते अवघे ४६ वर्षांचे होते. 

Web Title: honorary doctorate for late actor puneeth rajkumar from university of mysore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.