HOT GOSSIP: ​सलमान खानच्या आयुष्यात पुन्हा परतली कॅटरिना कैफ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 05:51 AM2017-03-17T05:51:01+5:302017-03-17T11:21:01+5:30

चार वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे त्यांचे चाहते जबरदस्त खूश आहेत.  सलमान ...

HOT GOSSIP: Katrina Kaif returns to Salman Khan's life again? | HOT GOSSIP: ​सलमान खानच्या आयुष्यात पुन्हा परतली कॅटरिना कैफ?

HOT GOSSIP: ​सलमान खानच्या आयुष्यात पुन्हा परतली कॅटरिना कैफ?

googlenewsNext
र वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे त्यांचे चाहते जबरदस्त खूश आहेत.  सलमान आणि कॅटरिनाच्या ‘टायगर जिंदा है’चे शूटींग सुरु झाले आहे. सोबत कॅटरिना सलमानच्या आयुष्यातही परतलीय. होय, ऐकता ते खरं ऐकताय.
कधीकाळी सलमान व कॅट रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्यात. आता ही जोडी पुन्हा आपल्या जुन्या रिलेशनशिप स्टेट्समध्ये परतल्याची चर्चा आहे. ‘टायगर जिंदा है’च्या सेटवर दोघांचीही जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. यावरूनच या चर्चेचे पेव फुटले आहे.

ALSO READ :मी कधीच ऐश्वर्याला मारहाण केली नाही; हे आत्ता का सांगतोय सलमान खान ?

‘टायगर जिंदा है’च्या शूटचे पहिले शेड्युल्ड आॅस्ट्रेलियामध्ये लागलयं.  अलीकडे शूटींगदरम्यान कॅटरिना जखमी झाली होती. तिच्या पाठीला बरीच इजा झाली होती. डॉक्टरांनी यानंतर कॅटला विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. अशा स्थितीत ‘टायगर जिंदा है’च्या सेटवर सलमान कॅटरिनाची पुरेपूर काळजी घेताना दिसतो आहे. शूटींगदरम्यान कॅटला त्रास होऊ नये. केवळ सोप्या दृश्यांचे शूटींग व्हावे, यासाठी तो धडपडतो आहे. सलमानची कॅटरिनाबद्दलची ही अतिकाळजी बघता, दोघेही पुन्हा परस्परांच्या जवळ आल्याचा कयास बांधला जात आहे. सलमानचे नाव सध्या रोमानियन ब्युटी यूलिया वंटूर हिच्यासोबत जोडले जात आहे. तर रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना सध्या सिंगल आहे. अशात खरे काय, ते सलमान व कॅट या दोघांनाच माहित. कारण तसेही सलमानच्या मनाचा अंदाज आजपर्यंत कोण घेऊ शकलयं? होय ना ?
   ‘टायगर जिंदा है’मध्ये दबंग खानप्रमाणेच कॅटरिनाही खतरनाक अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे.  सलमान-कॅटचा हा मचअवेटेड सिनेमा यंदा डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: HOT GOSSIP: Katrina Kaif returns to Salman Khan's life again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.