Hotness Overloaded...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं शेअर केला बिकनीतील हॉट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 20:00 IST2019-10-07T20:00:00+5:302019-10-07T20:00:00+5:30
बिकनीतील फोटो शेअर करण्याची या अभिनेत्रीची ही पहिली वेळ नसून तिचे फोटोदेखील व्हायरल झाले होते.

Hotness Overloaded...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं शेअर केला बिकनीतील हॉट लूक
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भारुचा हिने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'ड्रीमगर्ल' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात तिच्यासोबत आयुषमान खुराणा मुख्य भूमिकेत आहे. सध्या ती व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.
नुसरत सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंना खूप लाईक्स व कमेंट्स मिळत असतात. नुकताच तिने इंस्टाग्रामवर बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.
नुसरतने शेअर केलेल्या फोटोत व्हाइट रंगाची प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे. या फोटोत ती खूप बोल्ड दिसते आहे.
या फोटोंमध्ये नुसरत समुद्राच्या पाण्यात मस्ती करताना दिसते आहे. इतकंच नाही तर कंबरेखालील टॅटूदेखील दिसतो आहे. त्यामुळे तिचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
बिकनीतील फोटो शेअर करण्याची नुसरतची ही पहिली वेळ नाही आहे.
यापूर्वीदेखील तिने बिकनीतील फोटो शेअर केले असून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.