...इथेही घरोघरी भांडणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 11:20 AM2018-03-28T11:20:48+5:302018-03-28T16:57:55+5:30
घरोघरी वाद असतात असे म्हटले तर त्यात बºयाच अंशी तथ्य आढळेल. सर्वसामान्य कुटुंब असो वा प्रतिष्ठित, यास अंतर्गत कलहाची ...
घरोघरी वाद असतात असे म्हटले तर त्यात बºयाच अंशी तथ्य आढळेल. सर्वसामान्य कुटुंब असो वा प्रतिष्ठित, यास अंतर्गत कलहाची किनार असतेच. यास बॉलिवूडही अपवाद नाही. कारण बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांचे त्यांच्या कुटुंबीयांशी अजिबातच पटत नाही. काही स्टार्स तर अजूनही आपल्या कुटुंबीयांशी दुरावा ठेवून आहेत. त्यामुळे पडद्यावर कौटुंबिक चित्रपटांमध्ये संस्कारी भूमिका साकारणारे हे स्टार्स वास्तविक जीवनात मात्र आप्तस्वकियांपासून दुरावा बाळगून आहेत. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...
अर्जुन कपूर
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेता अर्जुन कपूर याने मनातील सर्व राग दूर करीत वडील बोनी कपूर आणि सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशीला आधार दिला. पण एक काळ असाही होता, जेव्हा तो वडील बोनी कपूर, सावत्र आई श्रीदेवी आणि जान्हवी आणि खुशीपासून अबोला धरून होता. वडील बोनी यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केल्यामुळेच अर्जुनच्या मनात राग होता.
आमीर खान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाºया आमीर खानचे मोठा भाऊ फैजल खानशी अजिबातच पटत नाही. वास्तविक फैजल आणि आमीरने ‘मेला’ या चित्रपटात जिवाला जीव देणाºया भावाची भूमिका साकारली होती. पडद्यावरील त्यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहता वास्तविक जीवनातही या दोघा भावांमध्ये कमालीचे प्रेम असेल असा समज त्यावेळी प्रेक्षकांना झाला असेल. मात्र जेव्हा फैजलने आमीरवर घरात कोंडून ठेवल्याचा आरोप केला, तेव्हा प्रेक्षकांचा त्यांच्याबद्दल भ्रमनिराश झाला असेल यात शंका नाही. फैजलने जेव्हा आमीरवर आरोप केला होता, तेव्हा त्यांचे वडील ताहिर हुसैन आणि आमीर हेदेखील आमने-सामने उभे राहिले होते. हा वाद एवढा विकोपाला गेला होता की, अखेर हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहाचले. त्यानंतर न्यायालयाने फैजलची कस्टडी वडिलांकडे दिली.
कंगना राणौत
बॉलिवूडची क्वीन कगंना राणौतला तिच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाते. कारण निर्माता करण जोहरपासून ते बॉलिवूडमधील अनेक स्टार्सशी तिने पंगा घेतला आहे. कुटुंबातील सदस्यांबद्दलही कंगना अशीच काहीशी आक्रमक आहे. एका मुलाखतीत तिने जाहीरपणे सांगितले होते की, मी माझ्या आई-वडिलांची नकोशी संतती आहे. यामुळेच तिचे वडिलांबरोबर आजही पटत नसल्याचे समजते.
रणबीर कपूर
ट्विटरवर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेणारे अभिनेते ऋषी कपूर यांचे कुटुंबातील सदस्यांशी फारसे जमत नाही. त्यांचा मुलगा रणबीर कपूरसोबत तर त्यांचे नेहमीच खटके उडत असतात. याचे प्रमुख कारण म्हणजे रणबीर लहानपणापासूनच पापा ऋषी यांना त्याच्या आईशी वाद घालताना बघत आला आहे.
रेखा
बॉलिवूडच्या एवरग्रीन अभिनेत्री रेखा यांना त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. रेखा या पडद्यावर प्रेक्षकांना जेवढ्या उमजल्या तेवढ्याच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलही प्रेक्षक जाणून आहेत. रेखा यांचे सुरुवातीपासूनच वडील जेमिनी गणेशन यांच्याशी चांगले सख्य नाही. त्यांनी लहान वयातच शिक्षण सोडून कामाला सुरुवात केली.
अमिषा पटेल
अर्थशास्त्रात सुवर्णपदक मिळविणाºया अभिनेत्री अमिषा पटेलच्या आई-वडिलांना कधीच वाटत नव्हते की, तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवावे. मात्र अशातही अमिषाने आई-वडिलांशी भांडण करून फिल्मी दुनियेत करिअर शोधले. पुढे जेव्हा अमिषाचे नाव दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले, तेव्हा तिच्या आई-वडिलांचा चांगलाच पारा चढला होता. त्यांनी तिच्याशी अबोला धरणे पसंत केले. आज अमिषा पडद्यावरून जरी गायब असली तरी, आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.
प्रतीक बब्बर
अभिनेता प्रतीक बब्बर याचा जन्म होताच त्याची आई अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन झाले. याचाच राग धरून प्रतीक अजूनही वडील राज बब्बरवर नाराज आहे. प्रतीकचा आरोप आहे की, वडील राज बब्बर यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या परिवाराकडेच अधिक लक्ष दिले.