अक्षय कुमार अन् रितेशच्या कॉमेडीचा तडका, Housefull 5 पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 13:06 IST2023-06-30T13:05:20+5:302023-06-30T13:06:12+5:30
अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्ट करत 'हाऊसफुल 5' ची घोषणा केली.

अक्षय कुमार अन् रितेशच्या कॉमेडीचा तडका, Housefull 5 पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
2024 ची दिवाळी खास असणार आहे. साजिद नाडियादवालाने अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' (Housefull 5) ची नुकतीच घोषणा केली आहे. सर्वांना हसवण्यासाठी हाऊसफुल पुन्हा सज्ज आहे. यावेळी पाचपट धम्माल होणार हे नक्की.यासोबतच हाऊसफुल हा पहिलाच असा भारतीय सिनेमा असेल ज्याचे ५ भाग प्रदर्शित होतील. २०१० मध्ये सुरु झालेला 'हाऊसफुल' आता पाचव्या भागासह २०२४ मध्ये रिलीज होत आहे.
अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्ट करत 'हाऊसफुल 5' ची घोषणा केली. तरण मनसुखानी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत तर साजिद नाडियादवाला निर्मिती करणार आहेत. सिनेमातून पुन्हा एकदा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अक्षय कुमार दोघांची विनोदी जोडी बघायला मिळेल. यांच्याशिवाय इतर कोणते कलाकार असतील याबाबत अजून खुलासा केलेला नाही. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमा रिलीज होणार आहे.
अक्षय कुमारकडे सध्या सिनेमांची रांग आहे. टायगर श्रॉफसोबत तो 'बडे मिया छोटे मिया' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ऑल टाईम कॉमेडी फिल्म हेरा फेरी 3 चंही तो शूटिंग करत आहे. 'ओह माय गॉड २' देखील रिलीजच्या मार्गावर आहे. इतकंच नाही तर महेश मांजरेकरच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमातून तो मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकत आहे.