"मला अत्यंत वाईट पद्धतीने काढण्यात आलं अन्.."; 'जब वी मेट' बॉबीच्या हातून कसा गेला? अभिनेत्याने सांगितली इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:12 IST2025-04-19T15:11:27+5:302025-04-19T15:12:17+5:30
बॉबी देओलला तडकाफडकी 'जब वी मेट' सिनेमातून का काढण्यात आलं? अभिनेत्याला आजही त्या गोष्टीचं दुःख

"मला अत्यंत वाईट पद्धतीने काढण्यात आलं अन्.."; 'जब वी मेट' बॉबीच्या हातून कसा गेला? अभिनेत्याने सांगितली इनसाईड स्टोरी
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (bobby deol) सध्या त्याच्या करिअरच्या शिखरावर आहे. बॉबीने रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' सिनेमा खलनायकी भूमिका साकारुन बॉबीने सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं. बॉबी सध्या बॉलिवूडच नव्हे तर साउथ इंडस्ट्रीतही त्याच्या अभिनयाचा डंका वाजवतोय. बॉबीने नुकत्याच एका मुलाखतीत सुपरहिट 'जब वी मेट' सिनेमातून (jab we met movie) त्याला बाहेरचा रस्ता कसा दाखवण्यात आला, याची कहाणी सांगितली आहे. त्या घटनेचं आजही बॉबीला चांगलंच वाईट वाटतं. 'जब वी मेट'मधून बॉबीला का बाहेर काढण्यात आलं, जाणून घ्या
'जब वी मेट' बॉबीच्या हातून कसा गेला?
नुकत्यााच एका मुलाखतीत बॉबीने 'जब वी मेट' सिनेमसंबंधींचा एक कटू अनुभव सांगितला. बॉबी म्हणाला की, "जब वी मेटची सिनेमाची कल्पना इम्तियाज अलीला मीच दिली होती. त्यावेळी इम्तियाज फारसा प्रसिद्ध नव्हता आणि त्याला एका चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज होती. मी इम्तियाजला प्रोत्साहन दिलं आणि म्हणालो, चल, हा चित्रपट आपण करूया.”
बॉबी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार होता आणि एक प्रसिद्ध निर्माता सिनेमा प्रोड्यूस करायला तयारही झाला होता. सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र, काही काळाने निर्मात्यांनी विचार बदलले आणि बॉबीला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला.
बॉबीला आजही वाटतं या गोष्टीचं वाईट
बॉबीने या घटनेविषयी भावनिक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी इम्तियाजवर विश्वास ठेवला होता. मी त्याला संधी दिली आणि तो मोठा झाला. पण नंतर मात्र मलाच चित्रपटापासून दूर करण्यात आलं. ते खूप दुखावणारं होतं.” अशाप्रकारे बॉबीने घडलेली घटना सांगितली. बॉबीनंतर या सिनेमात शाहिद कपूरची वर्णी लागली. शाहिदच्या विरुद्ध करीना होती. शाहिद-करीनाचा 'जब वी मेट' सिनेमा चांगलाच गाजला. आजही या सिनेमाबद्दल भरभरुन बोललं जातं.