एक सिनेमांमधून इतके कोटी कमवते चंकी पांडेची लेक अनन्या, एका अ‍ॅडशूटसाठी घेते 10 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 07:45 PM2021-01-16T19:45:00+5:302021-01-16T19:50:26+5:30

अनन्या पांडे हिंदी सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे.

How many crores does chunky pandeys daughter ananya make for a film | एक सिनेमांमधून इतके कोटी कमवते चंकी पांडेची लेक अनन्या, एका अ‍ॅडशूटसाठी घेते 10 लाख

एक सिनेमांमधून इतके कोटी कमवते चंकी पांडेची लेक अनन्या, एका अ‍ॅडशूटसाठी घेते 10 लाख

googlenewsNext

अनन्या पांडे हिंदी सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे.  अनन्याने तिच्या अभिनयासोबतच लूक्स आणि स्टायलसाठीदेखील चर्चेत असते. आता अनन्याचा समावेश बॉलिवूडच्या टॉप ३० अभिनेत्रींमध्ये झाला आहे. अनन्याच्या कमाईविषयी बोलायचे झाले तर ती एक यशस्वी अभिनेत्री असल्याचे सिद्ध झाले आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार  २०२१ मध्ये अनन्याची एकूण संपत्ती २.२ दशलक्ष डॉलर्स इतकी म्हणजेच जवळपास २२ कोटी रुपये आहे.


सिनेमांशिवाय अनन्या सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 50 मिलियन फॉलोवर्स आहेत. आज आम्ही तुम्हाला अनन्याच्या प्रोफेशन आणि पर्सनल आयुष्याशी संबंधित काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत.  अनन्या पांडे बर्‍याच वेळा सोशल मीडियावर ट्रोल देखील होत असते तरीही तिने अभिनेत्री म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 


सन 2021 मध्ये अनन्याची संपत्ती
 सन २०२१ मध्ये अनन्या पांडेची एकूण मालमत्ता अंदाजे 3.21 मिलियन डॉर्लस म्हणजे जवळपास 22 कोटी रुपये आहे. अनन्याची तुलना आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, तारा सुतारिया अशा अभिनेत्रींसोबत केली जाते. अनन्याने आतापर्यंत केवळ दोन ते तीन सिनेमांत काम केले आहे. अनन्याची बरीचशी कमाई जाहिरातींमधून होते.

अनन्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एका पोस्टसाठी दोन लाख रुपयांपर्यंत फीस घेते.  गेल्या वर्षी अनन्याच्या संपत्ती ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  याशिवाय अनन्या एका सिनेमासाठी दोन कोटी रुपये मानधन घेते.  अनन्या एका जाहिरातीसाठी दहा लाख रुपये घेते.
 

Web Title: How many crores does chunky pandeys daughter ananya make for a film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.