बाबो..! एका लग्नात परफॉर्म करण्यासाठी शाहरुख खान घेतो इतके कोटी, रक्कम वाचून व्हाल हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:48 AM2020-09-16T11:48:44+5:302020-09-16T11:57:13+5:30
शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जाते.
शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जाते. त्याची जादू फक्त सिनेमा किंवा छोट्या पडद्यापर्यंत मर्यादित नाही. शाहरुखनने अनेकांच्या लग्नात हजेरी लावत चार चांद लावले आहेत. लोक लग्नांवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. काही लग्नांमध्ये बॉलिवूडच्या स्टार्सना कोट्यवधी रुपये देऊन आमंत्रित केले जाते. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार शाहरुख खान दुबईमध्ये एका हाय-प्रोफाईल लग्नात परफॉर्म करण्यासाठी जवळपास 8 कोटी रुपये घेतो.
निवडक लग्नांमध्ये लावतो हजेरी
शाहरुखच्या जवळच्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार तो व्यस्त शेड्यूलमुळे जास्त विवाहसोहळ्यांमध्ये जात नाही. याच कारणामुळे शाहरुख वर्षभरात काही निवडक विवाहसोहळ्यांमध्येच हजेरी लावतो.
शाहरुख खानचे चाहते त्याला रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी आतुर आहेत. शेवटचा तो आनंद एल राय यांच्या झिरो चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. त्यानंतर किंग खानला आगामी चित्रपटांची निवड करण्यात कोणतीच चूक करायची नव्हती.
अनेक सिनेमांनामध्ये काम करण्यास दिला शाहरुखने नकार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरूख खानने मागील दोन वर्षांपासून संजय लीला भन्साळी, मधुर भांडारकर, सलमान खान आणि अली अब्बास जफर यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे ऑफर नाकारले आहेत. काही महिन्यांपूर्वी असे वृत्त आले होते की शाहरूख राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तयार आहे. चित्रपट फ्लोअरवर जाण्याआधी त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
मीडिया रिपोर्टनुसार दिग्दर्शक मधुर भांडारकरने शाहरुखला इंस्पेक्टर गालिबच्या नावाने एका अॅक्शन चित्रपटाची ऑफर दिली होती. चित्रपटाच्या स्क्रीप्टसोबत भूमिका आवडलेली असतानाही शाहरूखने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण किंग खानला वाटले होते की मधुर भांडारकरने शाहरूख खानला मोठ्या एक्शन स्टारच्या रुपात सादर करणार नाही. त्यानंतर लगेच संजय लीला भन्साळी यांच्या साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकसाठी शाहरूख खान सोबत बातचीत केली पण शाहरुखला करियरच्या या वळणावर गीतकार-कवीच्या बायोपिक काम करणे योग्य वाटले नाही.