'परदेशात आपली प्रतिष्ठा किती वाढली...', महिमा चौधरीनं PM मोदींचं तोंडभरून कौतुक केलं; दिला असा सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:39 AM2024-03-18T10:39:41+5:302024-03-18T10:45:59+5:30
"इतर देशांमध्ये बघा त्यांचे शेजारील देशांसोबत किती भांडण सुरू आहे आणि आपल्याकडे शांतता आहे. आपण आपले काम शांतपणे करू शकतात. या सर्वांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते."
बॉलीवुडमधील कंगना रनौतपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेक कलाकार पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसून येतात. यातच आता 'परदेस' फेम महिमा चौधरीनेही पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदी हे आपले इंस्पिरेशन असल्याचेही महिमाने म्हटले आहे. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान कराला हवे, यावरही तिने आपली भूमिका स्पष्ट करत भाष्य केले आहे.
महिमा चौधरीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना म्हटले आहे की, आपल्याला कुणाला मत द्यायचे आहे? हे आपण आधीच निश्चित केले आहे. आपणही निश्चित करायला हवे, शेवटपर्यंत वाट बघत बसू नाक. बघा कुणी चांगले काम केले आहे, कुठल्या क्षेत्रात विकास होत आहे. बस केवळ विचारकरून आपले मत द्या.
परदेशात आपली प्रतिष्ठा किती वाढली आहे... -
मोदींचै कौतुक करताना महिमा म्हणाली, ‘परदेशात आपली प्रतिष्ठा किती वाढली आहे, आपण बघितले? सर्वजण भारताकडे अशा पद्धतीने बघत आहे, जसे आम्ही पूर्वी अमेरिकेकडे बघत होतो. भारत पुढे वाटचाल करत आर्थिक दृष्ट्याही मजबूत होत आहे. देशातील तरुणांकडून त्यांना (पंतप्रधान मोदी) बऱ्याच आशा आहेत.
‘इतर देशांमध्ये बघा त्यांचे शेजारील देशांसोबत किती भांडण सुरू आहे आणि आपल्याकडे शांतता आहे. आपण आपले काम शांतपणे करू शकतात. या सर्वांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते. ते अत्यंत इंस्पिरेशनल आहेत. ते जेथून आले आहेत आणि ज्या पद्धतीने पुढे गेले आहेत. त्यांच्याकडे बघून प्रत्येकाला असेच वाटते की, मीही काही तरी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने लोकांना इंस्पायर करण्याची ताकद फार कमी लोकांकडे असते. ते 24 तास काम करतात. बऱ्याच वेळा जेव्हा मीही थकते तेव्हा त्यांनाच इंस्पिरेशन मानते की, नाही मी तर केवळ एक घर चालवत आहे, ते तर एक देश चालवत आहेत. त्यांना किती अडचणी येत असतील? असेही महिमा म्हणाली.
#WATCH | Gaya, Bihar: Bollywood actress Mahima Chaudhary says, "I have already decided that whom to vote for, one shouldn't wait till the end... He(PM Modi) has done a good job, and our respect has increased in the world. We are getting economically stronger, and infrastructural… pic.twitter.com/fFfwUQJkUD
— ANI (@ANI) March 17, 2024
याच वेळी तीने मोदी सरकारच्या 'बेटी बचाऔ, बेटी पढाओ' या योजनेसंदर्भातही भाष्य केले. छोटीशी गोष्ट होती, त्यांच्या एका स्लोगनने लोकांचा विचार करण्याचा दृष्टीकोन बदलला, याचा परिणाम अगदी गावांपर्यंतबघायाला मिळाला,' असेही महिमाने म्हणाली.