न्यूड सीन देण्याआधी अशी झाली होती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 06:00 AM2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:02+5:30
या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एखा चित्रपटात न्यूड सीन दिला होता.
राजकुमार रावच्या मेड इन चायना या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले जात आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आपल्याला मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन त्याने खूप चांगल्याप्रकारे केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान दिलेल्या अनेक मुलाखतीत त्याने त्याच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
मेड इन चायना या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या खाजगी आयुष्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला होता. राजकुमारने नेहा धुपियाच्या फिल्टर नेहा या कार्यक्रमाच्या चौथ्या सिझनमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीविषयी तसेच बॉलिवूडमधील त्याच्या प्रवासाविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या. राजकुमारने 2010 मध्ये दिबाकर बॅनर्जीच्या लव्ह सेक्स और धोका या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने चक्क न्यूड सीन दिला होता. या चित्रपटात न्यूड सीन देण्याविषयी राजकुमारने त्याच्या घरात सांगितल्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती याविषयी त्याने या कार्यक्रमात नुकतेच सांगितले.
या कार्यक्रमात त्याने सांगितले की, लव्ह सेक्स और धोका या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी मला दिबाकर बॅनर्जी यांनी सांगितले की, या चित्रपटात तुला एक न्यूड सीन द्यायचा आहे. हे ऐकल्यावर सुरुवातीला मला काय बोलायचे हे कळतच नव्हते. पण हा माझ्या कामाचा एक भाग आहे असा मी विचार केला आणि यासाठी होकार दिला. हे दृश्य चित्रीत करायच्या आधी ही गोष्ट मी माझ्या पालकांना सांगितली पाहिजे असे मला वाटले. पण त्यांना हे सांगू कसे याचे दडपण मला आले होते. मी सुरुवातीला मला एक चित्रपट मिळाला असल्याचे त्यांना सांगितले हे ऐकून ते प्रचंड खूश झाले. पण त्यानंतर मी सांगितले की, शेवटच्या दृश्यात मी न्यूड असणार आहे. त्यांना हे ऐकून धक्का बसला होता. पण मी समजावून सांगितले की, या दृश्यात माझा केवळ पार्श्वभाग दिसणार आहे. हे ऐकल्यावर त्यांनी मला यासाठी संमती दिली.
राजकुमारने केवळ याच चित्रपटात नव्हे तर शाहीद आणि ओमेर्टा या चित्रपटात देखील न्यूड सीन दिले आहेत.