टेस्टसोबतच वाढत गेले होते संजय दत्तचे प्रश्न, वाचा हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 09:53 AM2020-08-13T09:53:18+5:302020-08-13T10:21:29+5:30
शनिवारी ८ ऑगस्ट रोजी संजय द्त्तला श्र्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्याला वाटलं होतं की, त्याला कोरोना झाला.
वेगवेगळ्या वादळांमधून बाहेर पडल्यावर सगळं काही ठीक सुरू असताना आयुष्य पुन्हा एखाद्या वाईट वळणावर आपल्याला नेऊन ठेवत असतं. असंच काहीसं अभिनेता संजय दत्तसोबत झालंय. संजय दत्त कोरोना महामारी संपण्याची आतुरतेने वाट बघत होता. जेणेकरून तो 'भुज', 'पृथ्वीराज', 'शमशेरा', 'केजीएफ २' सिनेमांच्या सेटवर जाऊ शकेल. पण अचानक काही ध्यानी मनी नसताना त्याला कॅन्सर झाल्याचं समजलं.
एका सूत्राने टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ८ ऑगस्ट रोजी संजयला श्र्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्याला वाटलं होतं की, त्याला कोरोना झाला. त्याने घरीच ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन लेव्हल चेक केली होती. लेव्हल कमी झाली होती. संजयला लगेच लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याची कोरोना टेस्ट केली जी निगेटिव्ह आली.
कोण होतं सोबत?
सूत्राने सांगितले की, संजयसोबत यावेळी त्याची बहीण प्रिया दत्त होती आणि त्याचा एक मित्र होता. हॉस्पिटलमध्ये इतर काही टेस्टमध्ये बघण्यात आलं की, त्याच्या उजव्या फुप्फुसात श्वासाची क्रिया होत नाहीय. नंतर एका सीटी स्कॅनमधून कळालं की, त्याच्या उजव्या फुप्फुसात पाणी जमा झालंय. सोबत दोन्ही फुप्फुसांवर काही जखमाही दिसल्या.
संजूचा प्रश्नांचा भडीमार...
संजयला आधी सांगण्यात आलं की, हे बॅक्टेरिअल इन्फेक्शन असू शकतं, टीबी असू शकतो, जास्त एक्सरसाइजमुळे जखम झालेल्या असू शकतात किंवा कॅन्सरही असू शकतो. नंतर फुप्फुसातून दीड लिटर पाणी काढण्यात आलं. त्यानंतर २ दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. यावेळी संजूला सांगण्यात आलं की, पाणी काढण्यात आलंय, पण आणखी काही टेस्ट कराव्या लागतील. तर त्यावरही संजय सतत प्रश्न विचारत राहिल्याचे समजते.
कॅन्सरचं निदान
संजय दत्तला सांगण्यात आलं की, त्याला PET स्कॅन करण्यास सांगण्यात आले. त्याचा PET स्कॅन पूर्ण होणारच होता की, हिस्टोपॅथोलॉजी डिपार्टमेंटला कळाल की, त्याच्या फुप्फुसातून काढण्यात आलेल्या पाण्यात कॅन्सर सेल्स आहेत. PET स्कॅनमध्येही कॅन्सरचं निदान झालं.
काउन्सेलिंग
त्याच्या आजाराबाबत लगेच त्याचं काउन्सेलिंग सेशन सुरू झालं. त्यानंतर त्याला ऑन्कोलॉजिस्टके पाठवण्यात आलं. जिथे त्याला पूर्ण प्लॅन सांगण्यात आला. या स्टेजवर सर्जरी होऊ शकत नाही. त्यामुळे केवळ कीमोथेरपीचा पर्याय उरतो.
हे पण वाचा :
संजू पूर्वीपासूनच लढाऊ वृत्तीचा आहे; ही वेळही निघून जाईल- मान्यता दत्त
संजय दत्तला कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत जाता येणार नाही? जाणून घ्या कारण
संजय दत्तच्या आयुष्यात कॅन्सर परतला, याआधी याच आजाराने हिरावून घेतला होता आयुष्यातला आनंद