​‘अंध’ हृतिकच्या हातात घड्याळ कसे? विचारणा-यांनो, हे वाचाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 05:04 PM2016-12-19T17:04:08+5:302016-12-19T17:04:08+5:30

‘काबील’चा ट्रेलर रिलीज झाला आणि लोकांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांची खिल्ली उडवणे सुरु केले. हृतिकने या चित्रपटात ...

How to watch 'blind' Hrithik? Ask people, this is a test !! | ​‘अंध’ हृतिकच्या हातात घड्याळ कसे? विचारणा-यांनो, हे वाचाच!!

​‘अंध’ हृतिकच्या हातात घड्याळ कसे? विचारणा-यांनो, हे वाचाच!!

googlenewsNext
ाबील’चा ट्रेलर रिलीज झाला आणि लोकांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांची खिल्ली उडवणे सुरु केले. हृतिकने या चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. हृतिक अंध आहे तर त्याच्या हातात घड्याळ कसे? असा प्रश्न(मूर्खपणाचा) सोशल मीडियावर विचारण्यात आला. हा प्रश्न विचारून अनेकांनी संजय गुप्ता यांना अक्षरश: वैताग आणला. अखेर संजय संयम सुटला आणि त्यांनीही प्रश्न विचारणा-यांना अगदी ‘तशाच’ धोबीपछाड भाषेत उत्तर दिले.



‘हृतिक अंध आहे, मग त्याच्या हातात घड्याळ कसे? असा प्रश्न मला अनेक जण विचारत आहेत. यावरून माझी खिल्ली उडवली जात आहे. प्लीज हा प्रश्न विचारणा-या ‘जीनिअस’ लोकांना कुणीतरी समजावून सांगा, असे संजय tweet संजय यांनी केले आहे. आता संजयचे हे tweet  म्हणजे प्रश्न विचारणा-यांना एक मोठी चपराक आहे, हे सांगायलाच नको. होय, ही चपराक आणखी जोरात बसावी म्हणून संजय यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. हा फोटो आहे,   खास अंध व्यक्तिंसाठी डिझाईन करण्यात आलेल्या घड्याळीचा. या घड्याळीला ब्रेल वॉच म्हणतात. हृतिकने घड्याळ कशी घातली, असा प्रश्न विचारणाºयांना मी सांगू इच्छितो की, ‘काबील’मध्ये हृतिकने ब्रेल वॉच घातलेली आहे. त्यामुळे आम्ही चित्रपटासाठी पूर्ण होमवर्क केलाय, यावर विश्वास ठेवा. या वॉचचीही चित्रपटात मोठी भूमिका आहे. मी याबद्दल फार काही सांगत नाही. पण सोशल मीडियावर या वॉचवरून सुरु झालेला प्रकार दुर्दैवी आहे. कुठलाही विचार न करता, थेट लक्ष्य करून समोरच्याचे खच्चीकरण करण्याची जणू प्रथाच भारतात पडलीय, अशा शब्दांत संजय यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 ‘काबील’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात हृतिक रोशनसोबत यामी गौतम दिसणार आहे.

{{{{twitter_post_id####}}}}

  

Web Title: How to watch 'blind' Hrithik? Ask people, this is a test !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.