हृतिक-दीपिका येणार पडद्यावर एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2016 06:59 AM2016-02-19T06:59:48+5:302016-02-18T23:59:48+5:30

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे प्रथमच एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या बातमीने या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांचा ...

Hrithik-Deepika comes together on screen | हृतिक-दीपिका येणार पडद्यावर एकत्र

हृतिक-दीपिका येणार पडद्यावर एकत्र

googlenewsNext
ong>हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे प्रथमच एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या बातमीने या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

हे दोघेही गुणी कलावंत पडद्यावर एकत्र पाहणे हा नक्कीच आनंददायी अनुभव असेल. आतापर्यंत या दोघांनी एकत्र कामच केलेले नाही. साजिद नाडियाडवालांनी मात्र त्यांना एकत्र आणण्याचे ठरवले आहे. सैफ अली खान आणि करिना कपूरच्या ‘फॅण्टम’ या चित्रपटानंतर साजिदनं दिग्दर्शक कबीर खानसह दीपिका आणि हृतिक यांना घेऊन चित्रपट करण्याचा संकल्प केला आहे.

साजिद दीपिकाचे काम पाहून भारावून गेला आहे. यापूर्वी तिच्यासह काम करण्याची साजिदची इच्छा या ना त्या कारणाने राहिली होती. आता मात्र आपल्या आगामी प्रकल्पात हृतिकसह दीपिकालाच घेऊन चित्रपट करण्याचे त्याने ठरवले आहे. 

Web Title: Hrithik-Deepika comes together on screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.