ऐश्वर्याबाबत हृतिक रोशनला होता हा मोठा गैरसमज, 'धूम २' नंतर केला होता त्यानेच खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:32 PM2021-11-24T13:32:14+5:302021-11-24T13:32:40+5:30
15 Years Of Dhoom 2: 'धूम २' हा सिनेमा रिलीज होऊन आता १५ वर्षे झाली आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतो की, कशाप्रकारे हृतिकचा ऐश्वर्याबाबतचा गैरसमज दूर झाला होता.
15 Years Of Dhoom 2: हृतिक रोशन (Hrithik Roshan) ने ‘धूम 2’ (Dhoom 2) सिनेमातून यशराज फिल्म्समध्ये एन्ट्री घेतली होती. २४ नोव्हेंबर २००६ ला रिलीज झालेल्या या सिनेमात ऐश्वर्या रायसोबत (Aishwarya Rai) हृतिक रोशन पहिल्यांदाच दिसला होता. संजय गाधवीने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अभिषेक बच्चनही होता. पण त्यावेळी ऐश्वर्या आणि त्याचं लग्न झालेलं नव्हतं. त्यासोबतच यात बिपाशा बसू, उदय चोप्रा आणि रिमी सेनही होती. हा सिनेमा रिलीज होऊन आता १५ वर्षे (15 Years Of Dhoom 2) झाली आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतो की, कशाप्रकारे हृतिकचा ऐश्वर्याबाबतचा गैरसमज दूर झाला होता.
बॉलिवूडचा ग्रीक गॉड मानला जाणारा हृतिक रोशनला यशराज बॅनरचा 'धूम २' सिनेमा मिळाला तेव्हा तो फार जास्त आनंदी नव्हता. कारण यात मुख्य अभिनेत्री ऐश्वर्या राय होती. ब्युटी क्वीन ऐश्वर्या रायबाबत हृतिक विचार करत होता की, ती केवळ तिच्या सुंदरतेमुळे फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे. मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत हृतिकने मान्य केलं होतं की, त्याला वाटत होतं की, ऐश्वर्शा एक अशी अभिनेत्री आहे जी केवळ सुंदर आणि टॅलेंटेड नाही. पण जेव्हा त्याने अभिनेत्रीसोबत शूट सुरू केलं त्याचा हा गैरसमज दूर होत गेला.
मुलाखतीवेळी हृतिक हा खुलासा करताना हसला होता. हृतिक म्हणाला होता की, 'कधी कधी काय होतं की, सुंदरता व्यक्तीच्या दुसऱ्या टॅलेंटला बाहेर येऊ देत नाही. मी जेव्हा ऐश्वर्यासोबत काम केलं तेव्हा समजलं की, ती फार टॅलेंटेड आहे. जोपर्यंत मी तिच्यासोबत काम केलं नाही तोपर्यंत मला हेच वाटत होतं की, ती केवळ सुंदर आहे, अभिनयाबाबत फार खास नाही. पण हा माझा गैरसमज दूर झाला. मी पाहिलं की, ती तिच्या कामाबाबत फार फोकस्ड आहे. इतकंच नाही तर ती तिच्या सीनमध्ये परफेक्शन आणण्यासाठी फार मेहनत घेते'.
'धूम २' रिलीज झाला होता तेव्हा हृतिक आणि ऐश्वर्याची जोडी प्रेक्षकांना फार आवडली होती. दोघांनी जबरदस्त काम केलं होतं. त्यानंतर हृतिक आणि ऐश्वर्याने 'जोधा अकबर', 'गुजारिश' सारख्या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमानंतर अभिषेक बच्चन यांचं करिअरही वरच्या लेव्हलला गेलं होतं.