खुलासा! हृतिक रोशन खरंच आहे का सबाच्या प्रेमात? समोर आली नवी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:10 PM2022-02-01T17:10:44+5:302022-02-01T17:12:32+5:30

Hrithik Roshan and Saba Azad : सुझैन खानसोबत घटस्फोट घेतल्यापासून हृतिकचं तसा सिंगल होता. पण आता कदाचित त्याच्या आयुष्यात सबा आहे.

Hrithik Roshan and Saba Azad Met Through A Common Friend And Went On A Holiday Together In Goa | खुलासा! हृतिक रोशन खरंच आहे का सबाच्या प्रेमात? समोर आली नवी माहिती...

खुलासा! हृतिक रोशन खरंच आहे का सबाच्या प्रेमात? समोर आली नवी माहिती...

googlenewsNext

काल परवा हृतिक रोशन (Hrithik Roshan) एका मिस्ट्री गर्लसोबत हॉटेलमधून बाहेर पडताना दिसला आणि वेगळीच चर्चा सुरू झाली. ही मिस्ट्री गर्ल कोण हे जाणून घेण्यास सगळेच उत्सुक होते. तर तिच्या नावाचाही खुलासा झालाये. ती दुसरी तिसरी कुणी नसून सबा आझाद (Saba Azad) आहे. आता हृतिक व सबाचं नाव जोडलं जातंय. हृतिक सबासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही केला जातोय.
सुझैन खानसोबत घटस्फोट घेतल्यापासून हृतिकचं तसा सिंगल होता. पण आता कदाचित त्याच्या आयुष्यात सबा आहे. गेल्या शुक्रवारी  सबा आझाद हृतिकसोबत एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली होती. त्यावेळी तिनं तोंडाला मास्क लावलेला होता. त्यानंतर सोशल मीडियावर  एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये हृतिकनं सबाचा हात धरलेला दिसत होता.

आता सबा व हृतिकची पहिली भेट कशी झाली? हेही समोर आलं आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार,  हृतिक आणि सबाची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे  झाली होती.   पहिल्या भेटीपासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर ते एका डिनर डेटवर भेटले. खरं तर ही भेट कामासंदर्भात होती. पण तिथून सबा व हृतिक सगळ्यांच्या नजरेत भरले.
मिड डेच्या वृत्तानुसार, सबा व हृतिक सुट्टीसाठी गोव्यात गेले होते. अनेक रिपोर्टनुसार, हृतिक व सबा एकमेकांना डेट करत आहेत. मात्र हे रिलेशन त्यांना पब्लिक करायचं नसल्याने गप्प आहेत. दोघंही आपलं खासगी आयुष्य सीक्रेट ठेवू इच्छितात.

सबा आझाद  एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. 1 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेली आणि दिल्लीत लहानाची मोठी झालेल्या सबाने थिएटर आर्टिस्ट म्हणून अ‍ॅक्टिंग करिअरला सुरूवात केली. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. 2008 साली ‘दिल कबड्डी’ या सिनेमातून तिचा डेब्यू झाला. यात ती राहुल बोससोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. पण तिला ओळख दिली ती 2011 साली रिलीज ‘मुझसे फ्रेन्डशिप करोगे’ या सिनेमाने. यात तिच्या अपोझिट साकिब सलीम दिसला होता. त्याआधी सबाने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. 2021 साली म्हणजे गतवर्षी ती ‘फील्स लाइक इश्क’ या सिनेमात दिसली होती.

2010 साली सबाने स्वत:ची थिएटर कंपनी उघडली होती. सबाला थिएटरसोबत गाण्याचाही शौक आहे. नसीरूद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत तिने ‘Madboy / Mink’ या इलेक्ट्रॉनिक बँडची सुरूवात केली होती़ 2013 साली इमादने सबासोबतचं रिलेशनशिप पब्लिक केलं होतं. सबा व मी दोन वर्षांपासून एकत्र राहत असून मी रिलेशनशिपमध्ये आहे, असं इमाद म्हणाला होता. या रिलेशनशिपचं पुढे काय झालं, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. 2013 साली यशराज फिल्म टॅलेंट डिव्हिजनने ‘धूम अँथम’चा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनलवर रिलीज केला होता़ यात सबाला कास्ट करण्यात आलं होतं. या अँथमला तिनं आपला आवाज दिला होता. 

Web Title: Hrithik Roshan and Saba Azad Met Through A Common Friend And Went On A Holiday Together In Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.