ब्रेकअपच्या चर्चा खोट्याच, हृतिकच्या घरी बाप्पाची आरती करताना दिसली सबा आजाद, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:27 IST2024-09-16T13:26:12+5:302024-09-16T13:27:35+5:30
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने तिच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली होती.

ब्रेकअपच्या चर्चा खोट्याच, हृतिकच्या घरी बाप्पाची आरती करताना दिसली सबा आजाद, Video व्हायरल
अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आजाद (Saba Azad) यांच्यात कधी ब्रेकअप कधी पॅचअप सुरु आहे. बऱ्याच दिवसांपासून सबा ाणि हृतिक एकमेकांसोबत दिसले नव्हते. यामुळे दोघांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली. मात्र या चर्चांदरम्यानच पुन्हा दोघं सोबत आले. रोशन कुटुंबात सबाने गणपतीची आरती केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने तिच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली होती. सुनैना यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत घरातील गणेशोत्सवाची झलक दाखवली. यामध्ये बाप्पाचं आगमन, आरती ते विसर्जन अशा सगळ्याचा एकत्रित व्हिडिओ त्यांनी शेअर केला. दरम्यान या व्हिडिओत सबा आजादचीही झलक दिसली. सबा गणेशाची आरती करताना दिसत आहे. तर बाजूला हृतिक उभा आहे. यानंतर विसर्जनावेळीही सबा दिसत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहून लव्हबर्ड्स अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत हेच यातून सिद्ध होतंय. यामुळे हृतिकचे चाहते खूश झालेत. काही दिवसांपूर्वी दोघंही मूव्ही डेटवरही गेले होते. तसंच डिनर डेटवरही दिसले. हृतिकने अद्याप प्रेमाची कबुली दिली नसली तरी तो सबाचा हात धरुन चालताना अनेकदा दिसला आहे. दोघांंमध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर आहे.
हृतिक रोशनचा सुझैन खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याचं नाव सबासोबत जोडलं जात होतं. शिवाय सुझैनही घटस्फोटानंतर अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आली. इतकंच नाही तर मुलांसाठी हृतिक आणि सुझैन आजही सोबत दिसतात. त्यांच्यातील या गुंतागुंतीच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.