Vikram Vedha Trailer :  ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ‘कहीं खूशी, कहीं गम’, नेटकरी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 03:34 PM2022-09-08T15:34:26+5:302022-09-08T15:36:01+5:30

Vikram Vedha Trailer : काही लोकांना ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर भलताच आवडला आहे. पण काहींनी ट्रेलर बघून चित्रपटाला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलाये तो हृतिक रोशन...

hrithik roshan and saif ali khan starrer vikram vedha trailer social media users reactions | Vikram Vedha Trailer :  ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ‘कहीं खूशी, कहीं गम’, नेटकरी म्हणाले..

Vikram Vedha Trailer :  ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ‘कहीं खूशी, कहीं गम’, नेटकरी म्हणाले..

googlenewsNext

2017 साली आर. माधवन व विजय सेतुपतीचा ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा तामिळ सिनेमा रिलीज झाला होता. सुमारे 5 वर्षानंतर या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक ‘विक्रम वेधा’ याच नावाने प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) व सैफ अली खान (Saif Ali Khan ) लीड रोलमध्ये आहेत. तर आता हृतिकच्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि ट्रेलर पाहून सोशल मीडियावर युजर्स प्रतिक्रियाही देत आहेत.
काही लोकांना ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर भलताच आवडला आहे. पण काहींनी ट्रेलर बघून चित्रपटाला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलाये तो हृतिक रोशन. हृतिकने सब कचरा कर दिया, अशा कमेंट्स युजर्स करत आहेत.

‘विक्रम वेधा’मध्ये सैफ अली खान आर माधवनने साकारलेल्या भूमिकेत आहे. तर हृतिकने विजय सेतुपतीने साकारलेल्या वेधाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. विजय सेतुपतीने वेधाच्या रोलमध्ये जीव ओत्ला होता. पण हृतिकने या भूमिकेचं मातेरं केलं, अशी प्रतिक्रिया अनेक युजर्स देत आहेत. विशेषत: हृतिकाने बिहारी एक्सेंट व बॉडी लँग्वेजवर प्रचंड मेहनत घेत विजय सेतुपती बनण्याचे प्रयत्न केलेत. पण तो यात पुरता अपयशी ठरला, असं नेटकरी म्हणत आहेत.

काही चाहत्यांनी मात्र ‘विक्रम वेधा’च्या ट्रेलरला 5 पैकी 5 मार्क्स दिले आहेत. हृतिकचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर होणार, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे. ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर एकदम सुपरडुपर आहे. हृतिकने कुठेही विजय सेतुपतीला कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही. हृतिकने दमदार अभिनय केला आहे, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

‘विक्रम वेधा’ या चित्रपटात सैफ अली खानने विक्रम या एका कठोर, कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याची भूमिका साकारली आहे तर हृतिक रोशनने वेधाची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील फाईट सीन्स जबरदस्त आहेत. तामिळ ‘विक्रम वेधा’ चित्रपट 21 जुलै 2017 रोजी केवळ तामिळ भाषेत प्रदर्शित झाला होता. केवळ 11 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल 70 कोटी रुपयांचा गल्ला केला होता. आता याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात येत आहे. विशेष म्हणजे पुष्कर-गायत्री हेच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Web Title: hrithik roshan and saif ali khan starrer vikram vedha trailer social media users reactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.