"अरे काय करताय तुम्ही?" एअरपोर्टवर उतरताच पापाराझींवर निघाला हृतिकचा राग, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 12:10 PM2024-06-03T12:10:48+5:302024-06-03T12:14:30+5:30

हृतिक रोशनचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. यात त्याचा पापाराझींवर चांगलाच राग निघालेला दिसतोय? (hrithik roshan)

hrithik roshan angry on paparazi that click his photographs at mumbai airport | "अरे काय करताय तुम्ही?" एअरपोर्टवर उतरताच पापाराझींवर निघाला हृतिकचा राग, व्हिडीओ व्हायरल

"अरे काय करताय तुम्ही?" एअरपोर्टवर उतरताच पापाराझींवर निघाला हृतिकचा राग, व्हिडीओ व्हायरल

'ग्रीक गॉड' अशी ओळख असलेला अभिनेता हृतिक रोशन त्याच्या कूल स्वभावामुळे चाहत्यांचा फेव्हरेट. 'कहो ना प्यार है' पासून काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या 'फायटर'पर्यंत हृतिकने सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. हृतिक जेव्हा फोटोग्राफर मीडियासमोर असतो तेव्हा तो सहसा कोणावर रागावताना दिसत नाही. पण नुकताच हृतिकचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात तो समोर असलेल्या मीडियावर चांगलाच रागावलेला दिसतोय.

हृतिकने पापाराझींवर काढला राग

रविवारी २ जूनला हृतिक मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. हृतिकचे फोटो कॅमेरात काढण्यात फोटोग्राफर्सनी एकच गडबड केलेली दिसली. सुरुवातीला हृतिक शांतपणे त्याच्या कारच्या दिशेने चालताना दिसला. परंतु काहीच सेकंदात पापाराझींनी गडबड केलेली पाहताच तो नाराज झाला. "देखो, क्या कर रहे हो आप?" असं तो म्हणाला. पुढे दुसऱ्या एका व्यक्तीकडे बघत हृतिक म्हणाला, "क्यू हो रहा है ये?" सरतेशेवटी गडबड न करता शांतपणे फोटो काढण्याची विनंती हृतिकने सर्वांना केली.

हृतिकचं वर्कफ्रंट

हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. गेल्या काही महिन्यांत हतिकने अभिनय केलेल्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं आहे. हृतिकने सैफ अली खानसोबत 'विक्रम वेधा' सिनेमात काम केलं. तर यावर्षा रिलीज झालेल्या हृतिकच्या 'फायटर' सिनेमाला सुद्धा बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. सध्या हृतिक ज्यु. NTR सोबत आगामी 'वॉर 2' सिनेमाचं शूटींग करतोय.

Web Title: hrithik roshan angry on paparazi that click his photographs at mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.