फरहान अख्तरच्या लग्नात हृतिकचा 'सेनोरिटा' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा हृतिक-फरहानची बॉडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 07:06 PM2022-02-20T19:06:44+5:302022-02-20T19:07:37+5:30

शनिवारी खंडाळ्यात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकले.

Hrithik Roshan dances on Senorita song at Farhan Akhtar's wedding, video goes viral | फरहान अख्तरच्या लग्नात हृतिकचा 'सेनोरिटा' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा हृतिक-फरहानची बॉडिंग

फरहान अख्तरच्या लग्नात हृतिकचा 'सेनोरिटा' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा हृतिक-फरहानची बॉडिंग

googlenewsNext

मुंबई:फरहान अख्तर(Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर(Shibani Dandekar)शनिवारी विवाहबंधनात अडकले. खंडाळ्यात अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी पाहुण्यांपैकी एक असलेल्या अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan)  डान्सचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये हृतिक फरहानसोबत  डान्स करताना दिसत आहे. रविवारी एका फॅन अकाउंटने फरहान आणि हृतिकचा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधील 'सेनोरिटा' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना चाहत्याने लिहिले की, 'फरहान अख्तरच्या लग्नात इमरान आणि अर्जुन 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सेनोरिटा डान्स रिक्रिएट करताना.

'सेनोरिटा' गाण्यावर फरहान-हृतिकचा परफॉर्मन्स
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' 2011 मध्ये रिलीज झाला होता, या चित्रपटात फरहान आणि हृतिकने इमरान आणि अर्जुन नावाच्या मित्रांची भूमिका साकारली होती. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून, या व्हिडिओवर चाहते विविध कमेंट्स करत आहेत. दरम्यान, दुसऱ्या एका फॅन अकाऊंटवरुन आणखी एका व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात फरहान त्याची पत्नी शिबानीसोबत 'दिल चाहता है' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

खंडाळ्यात विवाह सोहळा संपन्न
फरहान अख्तर यांच्या खंडाळ्यातील घरात शनिवारी हा विवाह सोहळा पार पडला. लग्नात फराह खान, रिया चक्रवर्ती, सतीश शाह, आशुतोष गोवारीकर आणि रितेश सिधवानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. शिबानीच्या बहिणी अनुषा दांडेकर, अपेक्षा दांडेकर आणि तिची बेस्ट फ्रेंड रिया चक्रवर्तीही लग्नाला हजर होत्या.

Web Title: Hrithik Roshan dances on Senorita song at Farhan Akhtar's wedding, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.