फ्लॉप चित्रपटांमुळे डिस्टर्ब झाला होता हृतिक रोशन, अमिषा पटेलला म्हणाला - "तू 'गदर'..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:39 PM2023-09-08T12:39:04+5:302023-09-08T12:42:03+5:30
Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या 'गदर २' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि सनी देओलने त्यात पुन्हा तारा सिंगची भूमिका साकारली.
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) सध्या तिच्या 'गदर २' (Gadar 2) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि सनी देओलने त्यात पुन्हा तारा सिंगची भूमिका साकारली. या चित्रपटामुळे अमीषा सतत चर्चेत आली आहे आणि आता तिने हृतिक रोशन(Hritik Roshan)बद्दल खुलासा केला आहे. या दोघांनी २३ वर्षांपूर्वी 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
नुकत्याच एका मुलाखतीत, अमिषा पटेलने त्या वेळेबद्दल सांगितले जेव्हा हृतिक रोशनने कबूल केले की त्याने फ्लॉप चित्रपट दिले, तर ती सलग दोन हिट चित्रपटांच्या यशाचा आनंद घेत होती. अमिषाने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, म्हणाला, 'हृतिक आणि मी सेटवर यावर चर्चा करायचो... एका शुक्रवारी हृतिक रोशन पंतप्रधानांनंतर देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनतो आणि दुसऱ्या शुक्रवारी लोक त्याचे चित्रपट स्वीकारत नाहीत. हे कसले जग आहे? पण मला वाटते की हृतिक हा ग्रीक गॉड आहे, तो कायमचा सुपरस्टार आहे. चांगली प्रतिभा कधीही डळमळीत होऊ शकत नाही.
तो खूप डिस्टर्ब असायचा...
ती पुढे म्हणाली की, तो वन फिल्म वंडर्स आहे आणि ते त्याची तुलना मागील वन फिल्म वंडर्ससोबत करु लागले. कोणाला असा टॅग देणं खूप वाईट आहे. जेव्हा मी तीन वर्षांनंतर राकेश अंकल यांची कोई मिल गयाची घोषणा ऐकली, तेव्हा मला वाटले की तो कमबॅक करतो आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली, 'अर्थात तो खूप डिस्टर्ब असायचा. आमचा पहिला चित्रपट एवढा मोठा हिट ठरला होता, अर्थातच अपयश तुम्हाला खूप त्रास देते आणि तो मला सांगतोय की 'अमिषा. तू दुसरा चित्रपट दिलास गदर, मी देतोय फ्लॉप, तू देतेस गदर. मी त्याला काळजी करू नकोस, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही असे सांगितले. तुलनात्मक विश्लेषणाने तो प्रभावित झाल्याचे शेवटी त्याने सांगितले.
हृतिक रोशन आणि अमिषा पटेलने कहो ना प्यार है सिनेमात एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी केले आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.