सुपरस्टार हृतिक रोशन पोहोचला रूग्णालयात, नक्की झालं तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:35 PM2022-02-18T12:35:27+5:302022-02-18T12:36:04+5:30
Hrithik Roshan : हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोत हृतिक रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला आहे आणि त्याच्या हाताला पट्टी देखील आहे. हृतिकची ही अवस्था पाहून चाहते घाबरले...
Hrithik Roshan in Hospital: हृतिक रोशनने (Hrithik Roshan) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि तो पाहून चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. फोटोत हृतिक रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला आहे आणि त्याच्या हाताला पट्टी देखील आहे. हृतिकची ही अवस्था पाहून चाहते घाबरले. तुम्हीही चिंतेत असाल जरा थांबा. कारण घाबरण्याचं कारण नाहीये.
कारण हृतिकला काहीही झालेलं नाही. आजारी आहे म्हणून तो रूग्णालयात पोहोचला नाही तर रक्तदानासारखं महान कार्यासाठी तो रूग्णालयात पोहोचला होता.
हृतिकने स्वत: फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. ‘माझा बी- निगेटीव्ह हा रक्तगट दुर्मिळ आहे. रूग्णालयात नेहमी याची कमतरता भासते. रक्तदानाचा संकल्प करतोय,’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
त्याची ही पोस्ट वाचून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
हृतिकचे डॅड राकेश रोशन यांनीही लेकाचं कौतुक केलं आहे. मला तुझा अभिमान वाटतो, अशी कमेंट त्यांनी या पोस्टवर केली आहे.
पर्सनल लाईफमध्ये सध्या हृतिक त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आहे.
हृतिक रोशन काही दिवसांपुर्वी सबा आझादसोबत एका रेस्टारंटच्या बाहेर स्पॉट झाला होता. या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. हृतिक सबाला डेट करत असल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप हृतिक यावर काहीही बोललेला नाही. हृतिक सध्या विक्रम वेधा या रिमेकमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाता त्याच्यासोबत सैफ अली खान आणि राधिका आपटे दिसणार आहेत. फाइटर या सिनेमातही तो झळकणार आहे.