ठरले! हृतिक रोशन घेणार कंगना राणौतशी ‘पंगा’; बॉक्सआॅफिसवर रंगणार सामना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 01:00 PM2018-09-05T13:00:02+5:302018-09-05T13:07:10+5:30

‘सुपर30’ची रिलीज डेट लांबणीवर टाकली जाणार, असे मानले जात होते. पण नाही, ‘सुपर30’च्या रिलीज डेटमध्ये काहीही बदल झालेला नाही.

hrithik roshan film super 30 all set to clash with kangana ranauts film manikarnika on 25th january 2019 | ठरले! हृतिक रोशन घेणार कंगना राणौतशी ‘पंगा’; बॉक्सआॅफिसवर रंगणार सामना!!

ठरले! हृतिक रोशन घेणार कंगना राणौतशी ‘पंगा’; बॉक्सआॅफिसवर रंगणार सामना!!

googlenewsNext

कदाचित हृतिक रोशनचाहीकंगना राणौतसोबत ‘पंगा’ घेण्याचा मनसुबा आहे. होय, आपला ‘सुपर30’ हा आगामी चित्रपट कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’सोबत रिलीज होऊ नये, असे हृतिक रोशनची इच्छा असल्याची बातमी मध्यंतरी आली होती. यामुळे ‘सुपर30’ची रिलीज डेट लांबणीवर टाकली जाणार, असे मानले जात होते. पण नाही, ‘सुपर30’च्या रिलीज डेटमध्ये काहीही बदल झालेला नाही. काल रात्री हृतिकने ‘सुपर30’चा फर्स्ट लूक जारी केला. यानंतर आज सकाळी या चित्रपटाचे दोन नवे पोस्टर्स जारी केलेत. यापश्चात ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरून हृतिकचा हा बहुप्रतिक्षीत चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला रिलीज होणार, असा खुलास केला आणि याचबरोबर हृतिक व कंगनाचा बॉक्सआॅफिस संघर्ष रंगणार, हे स्पष्ट झाले.




विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक एका नॉन ग्लॅमरस भूमिकेत दिसणार आहे. यात तो एका गणितज्ञाची भूमिका साकारताना दिसेल. चित्रपटाच्या दोन्ही पोस्टर्सने चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. सोबतचं हृतिक विरूद्ध कंगना हा सामना कसा रंगणार आणि यात कोण बाजी मारणार, याबद्दलची उत्सुकताही वाढली आहे.
२५ जानेवारीला केवळ ‘सुपर30’ आणि ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ हे दोनचं चित्रपट रिलीज होणार नाही तर इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ हा चित्रपटही बॉक्सआॅफिसवर धडकणार आहे. याशिवाय शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे बायोपिक ‘ठाकरे’ही प्रदर्शित होणार आहे. एकंदर काय तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी बॉक्सआॅफिसवर कडवी लढत बघायला मिळणार आहे.

 

Web Title: hrithik roshan film super 30 all set to clash with kangana ranauts film manikarnika on 25th january 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.