जे बात! हॉलिवूड सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार हृतिक रोशन?

By अमित इंगोले | Published: November 5, 2020 03:25 PM2020-11-05T15:25:17+5:302020-11-05T15:32:40+5:30

फेब्रुवारीमध्ये हृतिक रोशनने एक अमेरिकन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी हायर केली होती. ही टॅलेंट एजन्सी हॉलिवूडमध्ये हृतिकला प्रमोट करेल. 

Is Hrithik Roshan going to play lead role of a spy in Hollywood film? | जे बात! हॉलिवूड सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार हृतिक रोशन?

जे बात! हॉलिवूड सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार हृतिक रोशन?

googlenewsNext

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हॉलिवूडमध्ये कामं केली आहेत. नुसतीच कामं केली नाही तर इंटरनॅशनल लेव्हलवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता यात यादीत बॉलिवूडचा हॅंडसम हंक हृतिक रोशन याचं नाव जोडलं जाणार आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये हृतिक रोशनने एक अमेरिकन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी हायर केली होती. ही टॅलेंट एजन्सी हॉलिवूडमध्ये हृतिकला प्रमोट करेल. 

आता जवळपास ८ महिन्यांनंतर अशी बातमी समोर येत आहे की, हृतिक रोशनला हॉलिवूड सिनेमात काम करण्याची ऑफर मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार लवकरच हृतिक रोशन हॉलिवूड सिनेमाचं शूटींग सुरू करणार आहे. (बाबो! हृतिक रोशननं खरेदी केलं स्वप्नातील घर, सी-फेसिंग व्ह्यू घराचा एरिया अन् किंमत वाचून व्हाल अवाक्)

असेही सांगितले जात आहे की, हॉलिवूडच्या या अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेात हृतिक रोशन एका गुप्तहेराची मुख्य भूमिका साकारणार आहे. अशीही माहिती आहे की, हृतिकने या सिनेमासाठी त्याची ऑडिशन टेपही रेकॉर्ड करून स्टुडिओला पाठवली आहे. पण अजून हृतिकचा रोल कन्फर्म झालेला नाही. पण असे मानले जात आहे की, 'कृष 4' चं शूटींग पूर्ण करून तो लवकरच अमेरिकेला जाऊ शकतो.

दरम्यान, याआधी हृतिक रोशन सुपरहिट अ‍ॅक्शन सिनेमा 'बॅंग बॅंग' आणि 'वॉर' सिनेमात दिसला होता. या दोन्ही सिनेमात हृतिक एका गप्तहेराच्या भूमिकेत दिसला होता. दोन्ही सिनेमातील त्याचे लूक्स आणि भूमिका खूप पसंत केल्या गेल्या होत्या. आता हे बघावं लागेल की, हॉलिवूड स्टुडिओ हृतिकला गुप्तहेराच्या भूमिकेसाठी साइन करणार की नाही.

Web Title: Is Hrithik Roshan going to play lead role of a spy in Hollywood film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.