Video : हृतिक रोशनच्या आईचा हा 'जबरा' डान्स पाहिलात?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 10:54 AM2019-07-23T10:54:45+5:302019-07-23T10:56:03+5:30
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टिव्ह असतो. हृतिकची आई पिंकी रोशनही याबाबतीत मागे नाहीत. लेकाप्रमाणेच पिंकी रोशन याही फिटनेस फ्रिक आहेत आणि त्याचमुळे त्यांचे सोशल अकाऊंट वर्क आऊटच्या व्हिडीओंनी खचाखच भरलेले आहे.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टिव्ह असतो. हृतिकची आई पिंकी रोशनही याबाबतीत मागे नाहीत. लेकाप्रमाणेच पिंकी रोशन याही फिटनेस फ्रिक आहेत आणि त्याचमुळे त्यांचे सोशल अकाऊंट वर्क आऊटच्या व्हिडीओंनी खचाखच भरलेले आहे. पण ताजा व्हिडीओ हा वर्कआऊटचा नसून डान्सचा आहे. होय, हृतिकने आपल्या आईचा डान्स व वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत आधी पिंकी रोशन वर्कआऊट करताना दिसतात आणि यानंतर हृतिकच्याच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सुपर 30’ या चित्रपटातील ‘जुगराफिया’ या गाण्यावर त्या ठेका ठरतात. हा व्हिडीओ शेअर करताना Wait for it... #championoflife #supermom#loveyoumama only a mother can express joy like this ❤️असे हृतिकने लिहिले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
पिंकी रोशन एकही दिवस वर्कआऊट मिस करत नाहीत. वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, योगा असे सगळे प्रकार त्या करतात. आपल्या आईच्या या फिटनेस प्रेमामुळे हृतिकही प्रभावित आहे. अलीकडे एका मुलाखतीत हृतिक आईबद्दल बोलला होता. माझी आई महिला शक्तीचे एक जिवंत उदाहरण आहे. तिच्या लहान मुलांसारखा उत्साह आहे. ती कायम दुसºयांना प्रभावित करत असते, असे तो म्हणाला होता.
पिंकी आणि राकेश रोशन यांचे लग्न १९७० मध्ये झाले. ऋतिकचे वडिल राकेश आणि आई पिंकी यांची पहिली भेट दोघांच्या वडिलांमुळे झाली होती. पिंकी यांचे वडिल, डायरेक्टर जे ओम प्रकाश होते आणि ते अनेकदा आपल्या मुलीसोबत रोशन कुटुंबाच्या घरी जायचे.
१९६७ मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर राकेश यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. याचकाळात पिंकी यांचे कुटुंब त्यांच्यासाठी परफेक्ट मॅच शोधत होते. पिंकी यांच्या वडिलांनी राकेश यांच्यासोबत त्यांचे लग्न ठरवले. राकेश रोशन यांनी १९७० मध्ये पिंकी यांच्याशी लग्न केले. पिंकी यांनी १९७२ मध्ये मुलगी सुनैनाला जन्म दिला. यानंतर १९७४ मध्ये हृतिकचा जन्म झाला.