हृतिक रोशनने कोरोनाचा घेतला धसका, घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 13:01 IST2021-03-26T12:51:48+5:302021-03-26T13:01:42+5:30
Hrithik Roshan Worried Of Increasing Covid Cases: रोज कोणत्या ना कोणत्या कलाकाराला कोरोनाची लागण होत आहे. हृतिक रोशनलाही कोरोनाने धडकी भरवली आहे. म्हणूनच रोशन कुटुंबियांनी कोरोनापासून बचावासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

हृतिक रोशनने कोरोनाचा घेतला धसका, घेतला मोठा निर्णय
पुन्हा एकदा कोरोनाचे संकट सर्वत्रच वाढत चालले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही नक्कीच धडकी भरवणारी आहे. त्यात गर्दीने भरलेल्या शहरांमध्ये तर कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये तर कोरोना रुग्णांची सख्या झपाट्याने वाढत आहे. कितीही केले तरी कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.
रोज कोणत्या ना कोणत्या कलाकाराला कोरोनाची लागण होत आहे. हृतिक रोशनलाही कोरोनाने धडकी भरवली आहे. म्हणूनच रोशन कुटुंबियांनी कोरोनापासून बचावासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांसाठी रोशन कुटुंबीय त्यांच्या फार्महाऊसमध्ये राहणार आहेत. मुंबई सोडून आता रोशन कुटुंबीय लोनावळ्यातील त्यांच्या फार्महाऊसमध्ये राहात आहेत. या फार्म हाऊसविषयी रसिकांना फार काही माहित नाही. अनेकांनी हे पाहिलंसुद्धा नाही. याच फार्महाऊसची आम्ही माहिती तुम्हाला देणार आहोत. रोशन कुटुंबाचे हे फार्महाऊस निसर्गाच्या सानिध्यात लोनावळ्यात आहे.
राकेश रोशन आणि हृतिक रोशन काही काम असेल तर मुंबईत येतात. मुंबई व्यतिरिक्त त्यांना लोनावळ्यातच राहायला जास्त आवडते. एरव्हीही कामातून ब्रेक मिळाल्यानंतर निवांत वेळ घालवण्यासाठी सारेच कुटुंबासह लोनावळ्याला जात असातात. आजूबाजूला डोंगर अन् त्या मधोमध हे विस्तीर्ण आलिशान असं राकेश रोशन यांनी हे फार्महाऊस बांधलंय. मुळात हृतिक रोशन आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होऊ देत नाही. हीच बाब लक्षात घेऊन या फार्महाऊसवर त्याच्यासाठी खास सुसज्ज अशी जिमही उभारण्यात आली आहे.
हृतिकच्या मुंबईतलं घरही आलिशान आहे. याच घराचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हृतिक आपला लेक रिहान आणि रिदानसह निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळते.हृतिकच्या आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी हृतिकने बरीच मेहनत घेतली आहे.
डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी हृतिकने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.