​ हृतिक रोशन कधीही विसरत नाही ‘ही’ गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 08:00 AM2017-08-16T08:00:46+5:302017-08-16T13:30:46+5:30

हृतिक रोशन भलेही मॉडर्न दिसतो. पण प्रत्यक्षात म्हणाल तर हृतिक अतिशय श्रद्धाळू व्यक्ती आहे. देवावर त्याची अपार भक्ती आहे. ...

Hrithik Roshan never forgets 'this' thing! | ​ हृतिक रोशन कधीही विसरत नाही ‘ही’ गोष्ट!

​ हृतिक रोशन कधीही विसरत नाही ‘ही’ गोष्ट!

googlenewsNext
तिक रोशन भलेही मॉडर्न दिसतो. पण प्रत्यक्षात म्हणाल तर हृतिक अतिशय श्रद्धाळू व्यक्ती आहे. देवावर त्याची अपार भक्ती आहे. त्यामुळेच रोज घराबाहेर पडताना तो, एक गोष्ट कधीही विसरत नाही. ती म्हणजे, गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला.
हृतिकच्या घरी अनेक दशकांपासून गणेश उत्सव साजरा केला जातो. हृतिक लहानपणापासून आपल्या घरी बाप्पाची आराधना करत आलाय. घरातील ही परंपरा हृतिकने खंडीत होऊ दिलेली नाही. त्यामुळे दरवर्षी हृतिकच्या घरी गणेश स्थापणा होते. हृतिक दरवर्षी मनोभावे बाप्पाची पूजा करतो. हृतिकचा हा श्रद्धाभाव कदाचित फार लोकांना ठाऊक नाही. अर्थात आपल्या या भक्तीभावाचे तो कधीही प्रदर्शन करत नाहीत. हा श्रद्धाळू स्वभाव तो स्वत:पर्यंत मर्यादीत ठेवतो. हृतिकचा हा भक्तिभाव त्याच्या ‘अग्नीपथ’ या सिनेमातही दिसला होता. यात तो गणपती भक्ताच्या रूपात दिसला होता.

यावर्षी ‘जानेवारी’त हृतिकचा ‘काबील’ आला होता. हा चित्रपट लोकांना चांगलाच भावला होता. ‘काबील’नंतर हृतिक रोशनने अद्याप एकही चित्रपट हाती घेतलेला नाही. तूर्तास हृतिककडे दोन प्रोजेक्ट आहेत. पहिला म्हणजे, ‘सुपर30’चे संस्थापक आनंद कुमार यांचे बायोपिक आणि दुसरा म्हणजे,‘कृष’ सीरिजचा दुसरा भाग. अलीकडे आनंद कुमार हृतिकच्या घरी पोहोचला होता. आनंद व हृतिक यांच्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात आनंद कुमार यांच्यावर चित्रपट बनणार असल्याची बातमी आली होती. कधीकाळी सायकलवरून पापड विकणारे आनंद कुमार पाटण्यात ‘सुपर 3०’ नावाची इन्स्टिट्यूट चालवतात. २००२ मध्ये आनंद कुमार यांना ‘सुपर30’ची सुरुवात केली. याअंतर्गत आनंद कुमार ३० मुलांना मोफत आयआयटीचे कोचिंग देतात.
 
 

Web Title: Hrithik Roshan never forgets 'this' thing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.