कोरोनाचा धसका! भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी मुंबई सोडून हलवला मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 01:53 PM2021-05-11T13:53:51+5:302021-05-11T13:56:32+5:30

कुटुंबातील सदस्य फार्महाऊसमध्ये राहायला गेले असले तरी सध्या हृतिक रोशन मात्र जुहूमधील त्याच्या अपार्टमेंटमध्येच राहत आहे.

hrithik roshan parents shifted to khandala farmhouse due to coronavirus | कोरोनाचा धसका! भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी मुंबई सोडून हलवला मुक्काम

कोरोनाचा धसका! भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी मुंबई सोडून हलवला मुक्काम

googlenewsNext
ठळक मुद्देनुकताच राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांनी लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता.

कोरोनामुळे देशभर दहशतीचे वातावरण आहे. व्हायरसचा जोर काहीसा कमी झालेला असला तरी मृतांची संख्या कमी व्हायची चिन्हे नाहीत. त्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. आजुबाजूचे वातावरण धडकी भरवणारे आहे. महाराष्ट्रात अनेक लोक मुंबई सोडून इतरत्र पलायन करताना दिसत आहेत. हृतिक रोशनचे (Hrithik Roshan) कुटुंबही मुंबई सोडून खंडाळा येथील फार्महाऊसवर राहायला गेल्याचे कळतेय. हृतिक मात्र अद्यापही जुहूस्थित त्याच्या अपार्टमेंटमध्येच आहे.

रिपोर्टनुसार, हृतिकचे कुटुंब काही सामानासह खंडाळ्याच्या अलिशान फार्म हाऊसवर शिफ्ट झाले आहे. हृतिकचे वडील राकेश रोशन (Rakesh roshan) फक्त महत्त्वाच्या मीटिंग्स वा महत्त्वाच्या कामासाठीच मुंबईत येतात. ऐरवी त्यांचा मुक्काम फार्म हाऊसवर आहे, पत्नी पिंकी रोशनही त्यांच्यासोबत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांना कोरोनाने ग्रासले आहेत. अशात सावधगिरी म्हणून राकेश रोशन यांनी मुंबईबाहेर जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी मुलाने खंडाळ्यात बांधलेल्या अलिशान फार्महाऊसमध्ये जाण्याचे त्यांनी पसंत केले.

नुकताच राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांनी लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता.  या सेलिब्रेशनचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले होते.  अनोखे सेलिब्रेशन म्हणून अ‍ॅनिव्हर्सरीच्या दिवशी पिंकी यांनी पुन्हा एकदा नववधू प्रमाणे नटत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. सोशल मीडियावर या अनोख्या सेलिब्रेशनचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. हातावर मेहंदी, आकर्षक साडीमध्ये नवराई पिंकी रोशन यांचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते. राकेश रोशन आणि पिंकी यांचे लग्न 1970 मध्ये झाले होते. पिंकी या राकेशच्या बालपणीच्या मैत्रीण आहेत. 
 


 

Web Title: hrithik roshan parents shifted to khandala farmhouse due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.