फरहान अख्तरनंतर हृतिक रोशनही दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, लवकरच रूमर्ड गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:31 IST2022-02-23T18:22:06+5:302022-02-23T18:31:55+5:30
सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan)सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

फरहान अख्तरनंतर हृतिक रोशनही दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, लवकरच रूमर्ड गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ?
सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan)सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हृतिकच्या डेटींगच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. तो अनेकवेळा अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad)सोबत स्पॉट झाला होता, त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. दरम्यान, बातम्या येत आहेत की हृतिक रोशन या नात्याबद्दल खूप सीरियस आणि त्याला लवकरात लवकर सबासोबत लग्न करायचे आहे.
हृतिक रोशन आणि सबा आझाद हळूहळू त्यांच्या नात्याला पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले जात आहे. बॉलिवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, हृतिक लवकरच सबासोबत लग्न करण्याचा विचार करत आहे. एका सूत्राने सांगितले की, हृतिक त्याच्या सबासोबतच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहे आणि त्याला हे नाते पुढे नेण्याची इच्छा आहे. तो लग्न करण्याचा विचार करत आहे. अद्याप काहीही ठरलेले नसले तरी दोघेही खूप आनंदी आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक सबासोबत लग्न करण्याच्या मूडमध्ये आहे.. त्याला हे नातं मीडियापासून दूर ठेवायचे आहे. ह्रतिक फरहान अख्तर आणि शिबानी अख्तर प्रमाणेच लग्न करण्याच्या विचारात आहे.
ट्विटरवरुन सुरू झाले बोलणे
सुरुवातीला दोघांची भेट कोणत्यातरी डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली असावी, असा अंदाज बांधला जात होता. पण, एका रिपोर्टनुसार, दोघांची ओळख ट्विटरवरून सुरू झाली आहे. हृतिकने सबा आणि इतर काही रॅपर्सचा व्हिडिओ लाइक केला होता, त्यावर सबाने हृतिकला 'धन्यवाद' म्हटले होते. त्यानंतर दोघांचे एकमेकांशी बोलणे सुरू झाले आणि ओळख वाढत गेली.