बॉयफ्रेंड असावा तर असा! 'गर्लफ्रेंडच्या हायहील्स हातात...' हृतिकच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 10:05 IST2023-04-05T10:04:19+5:302023-04-05T10:05:54+5:30
अंबांनींच्या इव्हेंटमध्ये 12 वर्ष लहान गर्लफ्रेंडच्या चपला हातात पकडून उभा होता अभिनेता हृतिक रोशन.

बॉयफ्रेंड असावा तर असा! 'गर्लफ्रेंडच्या हायहील्स हातात...' हृतिकच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या चर्चेत आहे ते गर्लफ्रेंड सबा आजाद (Saba Azad) मुळे. सध्या दोघांचेही हातात हात घालून फिरतानाचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजकाल दोघंही अनेक सार्वजनिक कार्यक्रमात जोडीने हजेरी लावतात. कॅमेऱ्यासमोर पोजही देतात. हृतिकचा आता एक नवीन फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये तो चक्क आपल्या लेडी लव्हच्या हील्स हातात घेऊन उभा आहे. बॉयफ्रेंड असावा तर असा!
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) हा २ दिवसीय सोहळा नुकताच मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. भारतीय संस्कृती, संगीत यांचं दर्शन घडवणारा हा सोहळा होता. कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी होती तर हॉलिवूडचेही काही सेलिब्रिटी पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत आला होता. कार्यक्रमातील हृतिकचा एक फोटो आता तुफान व्हायरल होतोय. इतर पाहुण्यांशी गप्पा मारताना हृतिकने त्याच्या हातात चक्क गर्लफ्रेंडच्या हाय हील्स पकडल्या आहेत. हा फोटो पाहून सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्स येत आहेत.
सबा आजाद डिझायनर अमित अग्रवाल सह फोटो काढण्यात मग्न होती तर तेव्हा हृतिक तिचे हाय हिल्स हातात पकडून उभा दिसतोय. यावर चाहत्यांनी कमेंट करत लिहिले,'यालाच प्रेम म्हणतात. किती सहजतेने तो सँडल पकडून उभा आहे.','हृतिक रोशन एक जंटलमन आहे.' तर दुसरा म्हणतो,'हृतिकने स्वत:चे शूड पकडले आहेत का?'
हृतिकने या इव्हेंटचे फोटो शेअर करत लिहिले, 'विथ लेडी इन रेड'. हृतिक आणि सबाला गेल्या वर्षी फेब्रुवारीत एकमेकांसोबत डेटवर गेलेले दिसले. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. हृतिकचा २०१४ मध्येच घटस्फोट झाला आहे. सुझेन खानसोबत १४ वर्षांचं नातं तोडत दोघंही वेगळे झाले. त्यांना २ मुलं आहेत. आता सुझेन खान अरसलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे तर हृतिक रोशन सबा आजादसोबत आहे. सबा हृतिकहून 12 वर्षांनी लहान आहे.