Corona Virus : हृतिक रोशनने शेअर केली पोस्ट, आदित्य ठाकरे यांनी केले प्रत्येकाने वाचण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 01:33 PM2020-04-05T13:33:00+5:302020-04-05T13:34:53+5:30
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही हृतिकची ही पोस्ट रिट्विट करत, सर्वांनी हे वाचा असे आवाहन केले आहे.
कोरोना व्हायरसने अख्ख्या जगभर हाहाकार माजवला आहे. भारतातही वेगळी स्थिती नाही. कोरोनावर कुठलेही औषध नाही. केवळ स्वत:चा बचाव आणि सुरक्षा हेच दोन उपाय आहेत. सरकार आणि देशभरातील डॉक्टर्स यासंदर्भात जनजागृती करत आहेत. अशात अभिनेता हृतिक रोशन यानेही एक अतिशय महत्त्वपूर्ण पोस्ट शेअर केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही हृतिकची ही पोस्ट रिट्विट करत, सर्वांनी हे वाचा असे आवाहन केले आहे.
हृतिकने आपल्या पोस्टमध्ये एका कोरोना पॉझिटीव्ह अनुभव शेअर केला आहे. जेणेकरून अफवांपासून दूर राहता येईल. हा रूग्ण आहे ऋषी गिरधर. ऋषी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाल्यानंतर सध्या कस्तुरबा रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. यादरम्यान अनुभव ऋषीने सोशल मीडियावर लिहिला आणि हृतिकने ऋषीचा हा अनुभव आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला.
Everyone has to read this! Stay away from rumours and don’t be afraid to go and test if you have the symptoms https://t.co/FIUQ9maqso
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 4, 2020
ऋषीची पोस्ट...
मी कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आहे. मी लंडनमध्ये शिकत होतो. कोरोना आऊटब्रेकदरम्यान मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मी मुंबईला परतलो. दोन दिवस माझ्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. 3 दिवसांनंतर मला थकवा जाणवू लागला. सुस्तपणा आणि हलका ताप होता. दुस-या दिवशी ताप 100वर पोहोचला. नंतर 101 वर. श्वास घ्यायला कुठलाही त्रास नव्हता. खोकला, सर्दी, घसा दुखणे असेही काही नव्हते. त्या रात्री मला उलटी झाली आणि यानंतर घरात फिरत असताना अचानक मी बेशुद्ध होऊन खाली कोसळलो. माझे काही दात तुटले, जबडा दुखावला. काहीतरी गडबड आहे, याचा हा सिग्नल होता. यानंतर आम्ही कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याच रात्री मी कस्तुरबा रूग्णालयात पोहोचलो. टेस्ट झाली आणि ती पॉझिटीव्ह आली. कस्तुरबाचे सर्व डॉक्टर्स व नर्स यांनी खूप मदत केली. मी चांगल्या हातात आहे, हे मी म्हणू शकतो. मला ठेवलेला वार्ड स्वच्छ आहे. टॉयलेट बाथरूम स्वच्छ आहेत. प्रत्येक ठिकाणी सॅनिटायजरच्या बॉटल आहेत. दरदिवशी खोलीची स्वच्छता केली जाते, बेडशीट्स बदलल्या जातात. इतक्या तत्पर डॉक्टर आणि नर्सचे मी केवळ आभार व्यक्त करेल...