हृतिक रोशन सबा आझादसोबत लवकरच करणार लग्न?, पोस्ट शेअर करून दिली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 13:20 IST2024-07-19T13:19:53+5:302024-07-19T13:20:28+5:30
Hritik Roshan-Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे नाते आता कोणापासून लपलेले नाही. हे कपल रोज कोणत्या ना कोणत्या पब्लिक पार्टीत किंवा कार्यक्रमात एकत्र दिसत असते.

हृतिक रोशन सबा आझादसोबत लवकरच करणार लग्न?, पोस्ट शेअर करून दिली हिंट
हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) अनेकदा त्यांच्या नात्यामुळे चर्चेत राहतात. हे जोडपे रोमँटिक डिनर डेट्स, बॉलिवूड पार्टी किंवा आउटिंगमध्ये त्यांच्या उपस्थितीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. अशा परिस्थितीत आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच, हृतिक रोशन आणि सबा आझाद त्यांच्या नात्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहेत. ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
खरेतर, गुरुवारी सबा आझादने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ती तिच्या अंगठीच्या बोटावर मेटॅलिक रिंग फ्लाँट करताना दिसत आहे. तिने या पोस्टवर 'Revealing soon' असे कॅप्शन लिहिले आहे, ज्यावर बॉयफ्रेंड हृतिक रोशनने कमेंट करून 'वाट पाहू शकत नाही' असे लिहिले आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे, मात्र अद्याप या दोन्ही सेलिब्रिटींनी कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. ही पोस्ट आगामी कार्यक्रम किंवा प्रोजेक्टसाठी देखील असू शकते.
हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची पहिली भेट
हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची पहिली भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. या भेटीनंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बरेच दिवस गुपचूप एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी काही काळापूर्वीच आपले नाते अधिकृत केले होते. हृतिक रोशनने २०१४ मध्ये त्याची पहिली पत्नी सुजैन खानपासून घटस्फोट घेतला. त्याचवेळी आता सुजैन खान देखील अर्सलान गोनीसोबत तिचे नाते पुढे नेत आहे. अनेक वेळा या चौघांना एकत्र क्वालिटी टाइम घालवतानाही पाहिले गेले आहे.