-अन् हृतिक रोशनने अवघ्या दोन महिन्यांत करून दाखवले अशक्य ते शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 03:19 PM2019-09-20T15:19:00+5:302019-09-20T15:19:38+5:30

नुकताच हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर लगेच तो नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला. पण हातात केवळ दोन महिन्यांचा वेळ होता आणि या दोन महिन्यांत हृतिकला स्वत:ला अशक्य ते शक्य करून दाखवायचे होते.

hrithik roshan transform himself for war within 2 months | -अन् हृतिक रोशनने अवघ्या दोन महिन्यांत करून दाखवले अशक्य ते शक्य!

-अन् हृतिक रोशनने अवघ्या दोन महिन्यांत करून दाखवले अशक्य ते शक्य!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘वॉर’ या सिनेमात टायगर आणि हृतिक गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत.

नुकताच हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर लगेच तो नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला. पण हातात केवळ दोन महिन्यांचा वेळ होता आणि या दोन महिन्यांत हृतिकला स्वत:ला अशक्य ते शक्य करून दाखवायचे होते. होय, अगदी अशक्य ते शक्य. हृतिकने जीवतोड मेहनत केली आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. ही गोष्ट म्हणजे, उत्तम शरीरयष्टी.


‘वॉर’ या चित्रपटासाठी हृतिकला उत्तम शरीरयष्टी हवी होती. हॉलिवूडलाही लाजवतील असे अ‍ॅक्शन सीन्स करण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा होता. पण हातात केवळ दोन महिन्यांचा अवधी होता. कारण त्याआधी ‘सुपर 30’ या चित्रपटात त्याने आयआयटीसाठी गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देणा-या आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. या काळात त्याने जिमला जाणे जवळजवळ बंद केले होते.


हृतिकने अलीकडे याबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, ‘सूपर ३० या चित्रपटानंतर  शरीर प्रचंड आळसावलेले होते. मी जिममध्ये जाणे सोडले होते. साहजिकच शरीर स्थूल झाले होते. पण ‘वॉर’साठी उत्तम शरिरयष्टी आवश्यक होती. यासाठी सलग काही महिने जिमममध्ये मेहनत घेणे गरजेचे होते. शेवटी मी कामाला लागलो. ‘वॉर’साठी मी अक्षरश: २४ तास काम केले. या २४ तासांत चित्रपटाचे संवाद पाठ करणे, कपडे ट्रॉय करणे, डॉक्टरांकडे उपचार घेणे आणि त्यानंतर वेळात वेळ काढून जिमला जाणे, अशी तारेवरची कसरत सुरु होती.’


‘वॉर’ या सिनेमात टायगर आणि हृतिक गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. पण पुढे टायगर हृतिकच्या विरोधात जातो आणि सुरु होते ते ‘वॉर’, असे याचे ढोबळ कथानक आहे.

Web Title: hrithik roshan transform himself for war within 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.