मुंबईच्या ट्राफिकला कंटाळून हृतिक रोशनचा मेट्रोने प्रवास, अनिल कपूर कमेंट करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 18:12 IST2023-10-13T18:11:28+5:302023-10-13T18:12:11+5:30
हृतिक रोशनलाही पडली मुंबईच्या मेट्रोची भुरळ, फोटो शेअर करत म्हणाला...

मुंबईच्या ट्राफिकला कंटाळून हृतिक रोशनचा मेट्रोने प्रवास, अनिल कपूर कमेंट करत म्हणाले...
अनेकदा मुंबईकर ट्राफिकमधून मार्ग आणि वेळ वाचवण्यासाठी मेट्रोला पसंती देतात. अनेक सेलिब्रिटींचेही मेट्रोमधून प्रवास केल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनलाही मेट्रोची भुरळ पडली आहे. हृतिकनेही मुंबई मेट्रोने प्रवास केला. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हृतिकने मेट्रोने प्रवास करण्याचा अनुभवही पोस्टमधून शेअर केला आहे."आज मी मेट्रोने प्रवास केला. काही गोड आणि दयाळू चाहते भेटले. त्यांनी दिलेलं प्रेम तुमच्याबरोबर शेअर करत आहे. हा अनुभव खूपच छान होता. ट्राफिक आणि गरमीवर बेस्ट ऑप्शन. मी ज्या अँक्शन शूटसाठी जात होतो, त्यासाठी माझी पाठ मजबूत राहिली," असं त्याने म्हटलं आहे. मेट्रोमधून प्रवास करताना हृतिकने चाहत्यांबरोबर फोटोही काढले. हृतिकचे मेट्रोमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हृतिकच्या या पोस्टवर बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी कमेंट केली आहे. "नम्र आणि काळजी घेणारा फायटर" असं त्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. हृतिकच्या पोस्टवरील अनिल कपूरच्या या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, हृतिक 'फायटर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.