PICS : हृतिक व सबाचं खुल्लमखुल्ला...! एअरपोर्टवर हातात हात घालून दिसले ‘लव्हबर्ड्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:32 IST2022-04-05T17:31:43+5:302022-04-05T17:32:06+5:30
Hrithik Roshan Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा आझाद दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. हातात हात घालून फिरतानाचे त्यांचे फोटो, एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर केलेल्या कमेंट्स पुरेशा बोलक्या आहेत. याऊपरही तुम्हाला पुरावा हवा असेल तर ताजे फोटो तुम्ही बघायलाच हवेत.

PICS : हृतिक व सबाचं खुल्लमखुल्ला...! एअरपोर्टवर हातात हात घालून दिसले ‘लव्हबर्ड्स’
हृतिक रोशन ( Hrithik Roshan )आणि सबा आझाद (Saba Azad) यांचं नातं आता बरंच पुढे गेल्याचं दिसतंय. दोघंही अगदी खुल्लमखुल्ला फिरताना दिसत आहेत. जानेवारी महिन्यात हृतिक एका मिस्ट्री गर्लसोबत हॉटेलमधून बाहेर पडताना दिसल्यानंतर वेगळीच चर्चा सुरू झाली होती. ही मिस्ट्री गर्ल कोण हे जाणून घेण्यास सगळेच उत्सुक होते. ती दुसरी तिसरी कुणी नसून सबा आझाद होती. तेव्हापासून हृतिक व सबाच्या नात्याची चर्चा सुरू आहे. हृतिक व सबा या नात्याबद्दल काहीही बोललेले नाहीत. पण दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. हातात हात घालून फिरतानाचे त्यांचे फोटो, एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर केलेल्या कमेंट्स पुरेशा बोलक्या आहेत. याऊपरही तुम्हाला पुरावा हवा असेल तर ताजे फोटो तुम्ही बघायलाच हवेत.
अलीकडे हृतिक व सबा एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झालेत. यावेळी दोघंही हातात हात घालून दिसले. दोघंही एकत्र कुठे गेले होते, हे माहित नाही. पण एकमेकांसोबत दोघंही प्रचंड आनंदी दिसले.सबा तर इतकी आनंदी होती की, तिला चेह-यावरचं हसू लपवता येत नव्हतं. एअरपोर्टवरून निघून दोघंही कारपर्यंत हातात हात घालून गेलेत.
हृतिक आणि सबाची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. पहिल्या भेटीपासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर ते एका डिनर डेटवर भेटले. खरं तर ही भेट कामासंदर्भात होती. पण तिथून सबा व हृतिक सगळ्यांच्या नजरेत भरले. सबा व हृतिक सुट्टीसाठी गोव्यात गेले होते. अनेक रिपोर्टनुसार, हृतिक व सबा एकमेकांना डेट करत आहेत. मात्र हे रिलेशन त्यांना पब्लिक करायचं नसल्याने गप्प आहेत. दोघंही आपलं खासगी आयुष्य सीक्रेट ठेवू इच्छितात.
सबा आझाद एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. 1 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेली आणि दिल्लीत लहानाची मोठी झालेल्या सबाने थिएटर आर्टिस्ट म्हणून अॅक्टिंग करिअरला सुरूवात केली. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. 2008 साली ‘दिल कबड्डी’ या सिनेमातून तिचा डेब्यू झाला. यात ती राहुल बोससोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. पण तिला ओळख दिली ती 2011 साली रिलीज ‘मुझसे फ्रेन्डशिप करोगे’ या सिनेमाने. यात तिच्या अपोझिट साकिब सलीम दिसला होता. त्याआधी सबाने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. 2021 साली म्हणजे गतवर्षी ती ‘फील्स लाइक इश्क’ या सिनेमात दिसली होती.