दिवाळी पार्टीमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक झाली हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान, सर्वांसमोरच केलं किस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 19:55 IST2022-10-24T19:54:23+5:302022-10-24T19:55:36+5:30
Sussanne Khan: कृष्ण कुमार यांच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रेटी पोहोचले होते. मात्र पार्टीची संपूर्ण लाइमलाइट बॉलीवूडमधील लव्हबर्ड्स सुझान खान आणि अर्सलान गोनी यांनी आपल्याकडे खेचून घेतली.

दिवाळी पार्टीमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक झाली हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान, सर्वांसमोरच केलं किस
मुंबई - देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूडच्या सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण दिवाळी उत्साहात साजरी करत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुलशन कुमार यांचे बंधू कृष्ण कुमार यांनी एक जंगी पार्टी दिली. या पार्टीमध्ये हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान तिच्या बॉयफ्रेंडसोबत सहभागी झाली होती. मात्र या पार्टीत असं काही घडलं की नंतर नेटिझन्सनी या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.
कृष्ण कुमार यांच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रेटी पोहोचले होते. मात्र पार्टीची संपूर्ण लाइमलाइट बॉलीवूडमधील लव्हबर्ड्स सुझान खान आणि अर्सलान गोनी यांनी आपल्याकडे खेचून घेतली. सुझान खान आणि अर्सलान गोनी पापाराझींसमोर एकमेकांसमोर रोमँटिक अंदाजात दिसले.
सोशल मीडियावर सुझान खान आणि अर्सलान गोनी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही दिवाळीच्या पार्टीमधून बाहेर येताना अर्सलान गोनी आणि सुझान खान एकमेकांना प्रेमाने बाय करताना दिसत आहेत. त्यानंतर पापाराझींसमोर एकमेकांना किस करताना दिसत आहेत. दोघांचाही लव्हिंग आणि रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हाररल झाल्यानंतर सोशल मीडियावर युझर्स अर्सलान गोनी आण सुझान खानला ट्रोल करत आहेत. तसेच सर्वांसमोर किस करण्याची गरज काय होती? असा सवाल विचारत आहेत.