हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खाननं बॉयफ्रेंड अर्सलानसोबत केलं लिप लॉक, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 18:58 IST2023-12-19T18:57:41+5:302023-12-19T18:58:35+5:30
Sussanne Khan : हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. लव्हबर्ड्स दोन वर्षांपासून डेट करत आहेत.

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खाननं बॉयफ्रेंड अर्सलानसोबत केलं लिप लॉक, व्हिडीओ झाला व्हायरल
बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन(Hritik Roshan)ची एक्स पत्नी सुजैन खान (Sussanne Khan) तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी(Arsalaan Goni)सोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. लव्हबर्ड्स दोन वर्षांपासून डेट करत आहेत. हातात हात घालून बाहेर पडण्यापासून ते रोमँटिक सुट्टीत जाण्यापर्यंत, जोडपे एकमेकांच्या प्रेमात गुरफटलेले दिसतात. आज १९ डिसेंबर रोजी अर्सलान गोनी त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक लोक अर्सलानला शुभेच्छा देत असतानाच त्याची गर्लफ्रेंड सुजैन खाननेही त्याला पोस्ट शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यात तिने शेअर केलेल्या व्हिडीओत लिपलॉक करताना दिसत आहे.
अर्सलान गोनीसोबतचे काही खास क्षण दाखवणारा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना सुजैन खानने लिहिले, 'हॅपी, हॅपी, हॅपी, हॅप्पी, बर्थडे माय लव्ह... तू माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहेस. मला वाटले होते त्यापेक्षा तू मला अधिक आनंदी केले आहेस. गोष्टी देण्याची तुझी क्षमता मला सर्वात आनंदी बनवते आणि म्हणूनच तू मला एक चांगली व्यक्ती बनवले, माझे प्रेम. दोघे मिळून खूप धमाल करुयात. मग काहीही असो, आपल्या पोटात थोडी आग आहे आणि आपल्या हृदयात एक ठिणगी आहे… हा प्रवास सुरू होऊ दे.. कारण बेबी आपण आताच सुरुवात केली आहे. मी तुझ्यावर प्रत्येक प्रकारे प्रेम करते.
सुजैन खानने बॉयफ्रेंडला दिल्या शुभेच्छा
व्हिडिओची सुरुवात सुझैन खान आणि अरसलान गोनीने चुंबन घेतल्यानंतर झाली, त्यानंतर त्यांनी मिठी मारली. जहाजावर एन्जॉय करण्यापासून ते डिनर डेटपर्यंत दोघेही एकमेकांसोबत अनेक मजेदार क्षण शेअर करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये अर्सलान गोनी आणि सुजैन खान एकमेकांना लिप किस करतानाही दिसत आहेत.
अर्सलान गोनी यांनी दिली प्रतिक्रिया
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, अर्सलान गोनीने कमेंट बॉक्समध्ये हार्टचे इमोजी टाकले आणि लिहिले की, 'धन्यवाद, माझ्या प्रिय.' सोशल मीडिया नेटकऱ्यांनी लगेच कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला आणि विविध कमेंट्स केल्या.
सुझैन खान आणि हृतिक रोशनचे लग्न
अर्सलान गोनीला भेटण्यापूर्वी सुजैन खानने अभिनेता हृतिक रोशनसोबत लग्न केले होते. या माजी जोडप्याला रेहान आणि ऋदान अशी दोन मुले आहेत. २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला असला तरी ते दोघे अजूनही आपल्या मुलांना एकत्र वाढवत आहेत आणि एकमेकांच्या संपर्कात आहेत. दरम्यान, हृतिक रोशनला अभिनेत्री सबा आझादमध्ये दुसरे प्रेम मिळाले आहे.