सारा अली खानने सोडला हृतिक रोशनचा चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 07:39 AM2017-01-30T07:39:58+5:302017-01-30T13:09:58+5:30
‘नवाब’ सैफ अली खान याची लाडकी लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूकडे सर्वच सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे. दिग्दर्शक ...
‘ वाब’ सैफ अली खान याची लाडकी लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूकडे सर्वच सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ दी ईयर2’मधून सारा बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी सुरुवातीला आली. यामुळे सिनेप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आणि याचदरम्यान साराने स्वत: या प्रोजेक्टमधून अंग काढून घेतल्याचे कळले. साराची मम्मी अमृता सिंग तिच्या या निर्णयामागे असल्याचेही नंतर समजले. ही बाब निश्चितपणे साराच्या डेब्यूकडे डोळे लावून बसलेल्यांचा हिरमोड करणारी होती. यानंतर बातमी आली ती सारा हृतिक रोशनसोबत बॉलिवूड डेब्यू करणार अशी. पण इथेही माशी शिंकलीच. होय, सारा या चित्रपटातूनही बाहेर पडल्याची ताजी बातमी आमच्या कानावर आलीयं. करण जोहर निर्मित आणि करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात दोन हिरोईन्स होत्या. यापैकी एक भूमिका सारा साकारणार होती. पण साराने ऐनवेळी या प्रोजेक्टलाही नकार दिल्याचे कळतेय. आता तिच्या या नकारामागचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.
ALSO READ : रणवीर सिंगच्या गल्ली बॉईजमध्ये झळकणार सारा अली खान?
सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू कुणासोबत?
सारा खानमुळे अमृता सिंग ‘मुबारका’ मधून बाहेर?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत नोव्हेंबरमध्ये या चित्रपटासंदर्भात हृतिक आणि करण यांच्या चर्चा झाली होती. ही चर्चा अद्यापही सुरु आहे. लवकरच हृतिक व करण पुन्हा भेटणार आहेत. येत्या मार्चपासून हृतिक व करण या प्रोजेक्टवर काम सुरु करतील, असेही कळतेय. मात्र सारा या प्रोजेक्टचा भाग नसणार आहे. अर्थात याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. हृतिकला याबाबत विचारले असता, त्यानेही यावर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे साराच्या बॉलिवूड डेब्यूबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. कदाचित साराकडे आॅफर्सचा पाऊस पडत असावा. कदाचित त्याचमुळे कुठली आॅफर स्वीकारावी अन् कुठली नाही, हे तिला कळत नसावे. आता काय खरे, हे सारा आणि तिच्या मॉमलाच ठाऊक!!