हृतिक रोशनचा गर्लफ्रेंड सबा आझादवर प्रेमाचा वर्षाव, व्हिडीओ शेअर करत लिहिले-"किलिंग"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:41 IST2024-12-05T11:40:54+5:302024-12-05T11:41:27+5:30

Hritik Roshan And Saba Azad : हृतिक रोशनने सोशल मीडियावर त्याची गर्लफ्रेंड सबाचं कौतुक केले आहे.

Hrithik Roshan's girlfriend Saba Azad showered with love, shared the video and wrote - "Killing" | हृतिक रोशनचा गर्लफ्रेंड सबा आझादवर प्रेमाचा वर्षाव, व्हिडीओ शेअर करत लिहिले-"किलिंग"

हृतिक रोशनचा गर्लफ्रेंड सबा आझादवर प्रेमाचा वर्षाव, व्हिडीओ शेअर करत लिहिले-"किलिंग"

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन ( Hritik Roshan) प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट शेअर करताना दिसतात. हृतिक गर्लफ्रेंड सबा आजाद(Saba Azad)चा प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. दरम्यान अभिनेत्याने सबासाठी एक छान व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती गाताना दिसते आहे.

हृतिक रोशनने नुकतेच सबाला चिअरअप करण्यासाठी इंस्टाग्राम हॅण्डलवर तिच्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आणि या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, किलिंग इट. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, अभिनेत्री लाइव्ह शोदरम्यान गाताना आणि नाचताना दिसते आहे. हे पहिल्यांदा नाही घडत आहे की हृतिक सबाचं कौतुक करतो आहे. तो नेहमी सोशल मीडियावर तिच्यासाठी छान मेसेज देत असतो. मागील महिन्यात हृतिकने सबाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्याने छान फोटो शेअर केले होते. 

अशी सुरू झाली लव्हस्टोरी
हृतिक आणि सबाची प्रेमकहाणी २०२२ मध्ये सुरू झाली. रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे पहिल्यांदा ट्विटरवर कनेक्ट झाले जेव्हा अभिनेत्याने सबा आणि रॅपरचा व्हिडिओ लाइक केला आणि शेअर केला. सबाने थँक्स मेसेजला रिप्लाय दिला, तिथून दोघांमध्ये संवाद सुरू झाला. फेब्रुवारी २०२२ मध्ये डिनर डेट दरम्यान ते पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्याच वर्षी नंतर ते करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसाला एकत्र दिसले.

या चित्रपटात दिसणार हृतिक रोशन 
हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर २' या ॲक्शन ड्रामामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता कबीरच्या भूमिकेची पुनरावृत्ती करणार आहे. आगामी ॲक्शन थ्रिलरमध्ये कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे, हा चित्रपट २०२५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Hrithik Roshan's girlfriend Saba Azad showered with love, shared the video and wrote - "Killing"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.