Hrithik Roshan : रोशन कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, हृतिकच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 10:33 AM2022-06-17T10:33:28+5:302022-06-17T10:40:12+5:30
Hrithik Roshan : बॉलिवूडमध्ये एकामागून एक दु:खद बातम्या ऐकायला मिळत आहेत. आता हृतिक रोशनच्या घरातून एक वाईट बातमी समोर आली आहे.
रोशन कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हृतिक रोशनची (Hrithik Roshan) आजी पद्माराणी ओमप्रकाश ( Padma Rani Omprakash ) यांचं वृदधापकाळाने निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. हृतिक हा आजीचा (Hrithik Roshan's maternal grandmother) सगळ्यात लाडका होता. आजीच्या तो खूप जवळ होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पद्मा राणी यांनी 16 जून रोजी पहाटे 3 वाजता अखेरचा श्वास घेतला. पद्मा राणी या हृतिकच्या आईच्या आई होत्या. तसेच पद्मा राणी दिवंगत दिग्दर्शक-निर्माता जे ओम प्रकाश ( J Om Prakash) यांच्या पत्नी होत्या. त्या दीर्घकाळापासून आजारी होत्या.
गुरूवारी रात्री त्यांच्या निधनाची बातमी आली. त्यांचे जावई व हृतिकचे वडील राकेश रोशन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. हृतिक रोशनचे आजोबा आणि दिग्गज चित्रपट दिग्दर्शक-निर्माते जे ओम प्रकाश यांचे 7 ऑगस्ट 2019 रोजी निधन झालं होतं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या निधनाच्या तीन वर्षानंतर आता हृतिकच्या आजीचं निधन झालं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पद्मा राणी यांना वयाच्या नव्वदाव्या वर्षी अनेक व्याधींनी ग्रस्त होत्या. दीर्घकाळापासून त्या अंथरूणावर होत्या. त्या गेल्या दोन वर्षांपासून रोशन कुटुंबासोबतच राहात होत्या. पद्मा यांची मुलगी आणि हृतिक रोशनच्या आई पिंकी रोशन वेळोवेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असत.
पद्मा राणी यांचे पती जे ओमप्रकाश यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. आखिर क्यूँ आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे. 1974 मध्ये ‘आप की कसम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा.
अफसाना दिलवालों का, आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अपर्ण, आस पास, आशा असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.त्याआधी निर्मातेअशी त्यांनी ओळख होती. 1961 साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला आणि तुफान गाजलेला ‘आँधी’ हा चित्रपटही त्यांनीच प्रोड्यूस केला. आप की कसम, भगवान दादा, आदमी खिलौना है, अपनापन, गेट वे ऑफ इंडिया अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.