हृतिक रोशनची बहीण या आजाराने आहे ग्रस्त?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 05:50 PM2019-06-10T17:50:04+5:302019-06-10T17:50:42+5:30

सुनैनाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे हृतिक रोशन, त्याचे वडील राकेश रोशन आणि आई सगळेच चांगलेच टेन्शनमध्ये आले आहेत.

Hrithik Roshan’s sister Sunaina refutes rumours of ‘being critical, in hospital’, says she is partying with friends | हृतिक रोशनची बहीण या आजाराने आहे ग्रस्त?

हृतिक रोशनची बहीण या आजाराने आहे ग्रस्त?

googlenewsNext
ठळक मुद्देसुनैना रोशनची नुकतीच तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिला 24 तास देखरेखीखाली ठेवले आहे. सुनैना बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त असून तिची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे म्हटले जाते.

बॉलिवूड कलाकारांची मुले बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी फिल्मी पार्ट्यांमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळते. पण अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना खूपच कमी वेळा कोणत्या समारंभात अथवा पार्टीमध्ये दिसते. 

सुनैना रोशनची नुकतीच तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिला 24 तास देखरेखीखाली ठेवले आहे. सुनैना बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त असून तिची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे म्हटले जाते.

सुनैनाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे हृतिक रोशन, त्याचे वडील राकेश रोशन आणि आई सगळेच चांगलेच टेन्शनमध्ये आले आहेत. सुनैनाच्या आजारपणाविषयी या आधी देखील बातम्या आल्या होत्या. सुनैनाला भावाप्रमाणे अभिनयात रस नाहीये. पण तिला दिग्दर्शनात इंटरेस्ट असून तिने तिच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांसाठी त्यांना असिस्ट केले आहे. क्रेजी 4 या चित्रपटाच्यावेळी वडिलांसोबत काम करत असताना तिला सर्वायकल कॅन्सर झाले असल्याचे कळले होते आणि त्यावर तिला उपचार घ्यावे लागले होते. किमोथेरपी केल्यामुळे तिचे संपूर्ण केस गेले होते आणि त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या सगळ्यामुळे तिचे खाण्यावर नियंत्रण नव्हते आणि तिचे वजन तब्बल 140 किलो इतके झाले होते. 

सुनैना रोशनने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे वजन 140 किलो झाले असल्याने तिला प्रचंड त्रास होत होते. अखेरीस तिने शरीरातील फॅट काढण्यासाठी सर्जरी केली आणि तिचे वजन 65 किलो झाले. वजनामुळे तिला प्रंचड त्रास व्हायचा. थोडे देखील चालल्यानंतर तिला धाप लागायची. पण या सगळ्यावर तिने मात केली. मात्र आजही तिला डायबटिड, हाटपरटेन्शन, स्लीप एपनिया यांसारखे अनेक आजार आहेत. 

सुनैना रुग्णालयात आहे अशा चर्चा होत असतानाच सुनैनाने एक ट्वीट करत सगळ्यांना बुचकळ्यात टाकले आहे. तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी खूप आजारी असून रुग्णालयात आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी माझ्या फ्रेंड्ससोबत पार्टी करत आहे. 



 

Web Title: Hrithik Roshan’s sister Sunaina refutes rumours of ‘being critical, in hospital’, says she is partying with friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.