अखेर या तारखेला प्रदर्शित होणार हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ !!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 12:59 PM2019-02-10T12:59:20+5:302019-02-10T13:00:22+5:30
आधी या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल ‘मीटू’च्या आरोपांत अडकला आणि त्याला या चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्यामुळे ‘सुपर 30’ रखडला. यानंतर कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका ’ या चित्रपटामुळे ‘सुपर 30’ रिलीज डेट बदलण्यात आली.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ दीर्घकाळापासून रखडला आहे. आधी या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल ‘मीटू’च्या आरोपांत अडकला आणि त्याला या चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्यामुळे ‘सुपर 30’ रखडला. यानंतर कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे ‘सुपर 30’ रिलीज डेट बदलण्यात आली. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट फायनल करण्यात आलीय. होय, हृतिक रोशनचा हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Open your Facebook app and scan the QR code to enjoy the #Super30ARFilterpic.twitter.com/KKPYD7qkTT
— Sushil K Kashyap (@SushilKashyap01) September 5, 2018
‘सुपर 30’ च्या रिलीज डेटबद्दलचा खुलासा करताना निर्माते शिवाशीष सरकार यांनी सांगितले की, आम्ही ‘सुपर 30’ पूर्ण करण्यासाठी कुठल्याही दिग्दर्शकाला घेतले नाही. प्रॉडक्शन हाऊसने आपल्या इन हाऊस रिसोर्सेजच्या मदतीने या चित्रपटाचे प्रोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण केले. आधी ‘सुपर 30’ गत महिन्यात २५ जानेवारीला रिलीज होणार होता. पण कंगनाचा ‘मणिकर्णिका’ही याच डेटला रिलीज होणार होता. त्यामुळे ऐनवेळी ‘सुपर 30’ची रिलीज डेट बदलण्यात आली होती.
#Super30ARFilter .... first time for an Indian film. In association with @facebook !! @iHrithik@RelianceEnt@NGEMoviespic.twitter.com/UIazZ3vK0B
— Shibasish Sarkar (@Shibasishsarkar) September 5, 2018
‘सुपर 30’ हा चित्रपट गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट आहे. आनंद कुमार बिहारात ‘सुपर 30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात.आनंद १९९२मध्ये गणित हा विषय शिकवायला सुरवात केली होती त्यावेळेस त्यांनी सुरवातीला महिना ५०० रुपये देऊन भाड्याच्या खोलीत शिकवायला सुरवात केली होती. पण नंतरच्या २ वर्षात याच्याकडे २ विद्यार्थ्यांपासून ३६ विद्यार्थी झाले आणि नंतर त्याच्याकडील विद्यार्थ्यांची संख्या ५०० वर गेली. पुढे त्यांनी ‘सुपर 30’ ची सुरवात केली.