हम दिल दे चुके सनमला झाली 22 वर्षं, सलमान खानने शेअर केला फोटो, पण कटाक्षाने टाळली ही गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 18:29 IST2021-06-18T18:28:00+5:302021-06-18T18:29:51+5:30
या चित्रपटाला नुकतेच 22 वर्षं पूर्ण झाले असून सलमानने या चित्रपटाच्या आठवणींना सोशल मीडियाद्वारे उजाळा दिला आहे.

हम दिल दे चुके सनमला झाली 22 वर्षं, सलमान खानने शेअर केला फोटो, पण कटाक्षाने टाळली ही गोष्ट
हम दिल दे चुके सनम हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याच्यासाठी नव-याला सोडून सातासमुद्रापार जाण्याची तयारी असलेल्या नंदिनीने रसिकांवर जादू केली. ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अजय देवगन सारख्या स्टारकास्टने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाला नुकतेच 22 वर्षं पूर्ण झाले असून सलमानने या चित्रपटाच्या आठवणींना सोशल मीडियाद्वारे उजाळा दिला आहे.
सलमानने संजय लीला भन्साळीसोबतचा एक फोटो पोस्ट करत हम दिल दे चुके सनम या चित्रपटाला 22 वर्षं झाले असे म्हटले आहे. या फोटोसोबत त्याने संजय लीला भन्साळी, अजय देवगण यांना टॅग केले आहे. पण त्याने या चित्रपटाची नायिका ऐश्वर्या राय बच्चनला टॅग करणे टाळले आहे. नेटिझन्सच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर सलमानला कमेंटद्वारे त्याविषयी नेटिझन्स विचारत आहेत.
सलमानने शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाला असून केवळ एका तासांत 5 लाख 87 हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो पाहिला आहे.